घरदेश-विदेशभामरागडमध्ये नक्षलींचा मोठा कॅम्प पोलिसांकडून उद्ध्वस्त

भामरागडमध्ये नक्षलींचा मोठा कॅम्प पोलिसांकडून उद्ध्वस्त

Subscribe

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी झाल्या. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांच्या गोळीबारानंतर या परिसरातील नक्षलवादी पळून गेले आहेत.

कोपर्शी आणि फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याच्या गोपनीय माहितीवरून नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान अभियान राबवण्यास गेले होते. रविवारी दुपारी साधारणतः साडेचारच्या सुमारास भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी अचानक अभियान पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनतर नक्षलवाद्यांनी पळ काढला.

- Advertisement -

जवानांनी पाठलाग केला तेव्हा त्यांनी पुन्हा गोळीबार केला. ही चकमक जवळजवळ अर्धा ते पाऊण तास सुरू होती. सी-६० जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहीम राबवली असता घटनास्थळाच्या परिसरात नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर असल्याचे आढळून आले. या शिबिरात आयईडी, मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. आयईडी जागेवरच नष्ट करण्यात आला. नक्षलवाद्यांची ही मोठी योजना असून ती उधळून लावण्यात यश प्राप्त झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -