घरट्रेंडिंगESIC Recruitment 2021: ESIC मध्ये तब्बल 6 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

ESIC Recruitment 2021: ESIC मध्ये तब्बल 6 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

Subscribe

बारावी उत्तीर्णांपासून ग्रॅज्युएट पर्यंत उमेदवार करू शकतात अर्ज

कर्मचारी राज्य बीमा महामंडळात (ESIC) तब्बल ६ हजार ५०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. (Vacancy 2021) या पदांसाठी १२ वी उतीर्ण असलेल्या उमेदवारांपासून ते कोणत्याही विषयातील पदवीधारांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्ण संधी आहे. (Govt Jobs) ६ हजारांहून अधिक जागांच्या या भरती प्रक्रियेत उच्च विभाग लिपिक (ESIC UDC) आणि स्टेनोग्राफर (ESIC Stenographer) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ESIC UDC साठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे अनिवार्य आहे. ESIC Stenographer या पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून कोणत्याही विषयासह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर उमेदवारांचा हिंदी आणि इंग्रजी टाइपिंग स्पीड ८० शब्द प्रति मिनिट असावा. तर उच्च विभाग लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि समतुल्य शिक्षण असणे गरजेचे आहे.

या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचा किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. केंद्र सरकारने भारताच्या राजपत्रात यासंबंधीची जाहीरात काढली आहे. अपर डिवीजन क्लर्क (UDC)/ अपर डिवीजन क्लर्क कॅशियरच्या ६,३०६ जागा, स्टेनोग्राफरची २४६ जागा अशी एकूण ६५५२ पदे भरण्यात येणार आहेत. तर, यासाठी पगाराचे स्वरुप २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये प्रति महिनापर्यंत आहे.

- Advertisement -

कर्मचारी राज्य बीमा महामंडळाची अधिकृत वेबसाईट 

https://www.esic.nic.in/

हेही वाचा- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -