घरताज्या घडामोडीसर्वसामान्य रुग्णांना महागाईची झळ, १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं महागणार

सर्वसामान्य रुग्णांना महागाईची झळ, १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं महागणार

Subscribe

येत्या १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं महागणार असून त्याची झळ सर्वसामान्य रुग्णांना बसणार आहे. या औषधांच्या यादीत पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्सचा समावेश आहे. सरकारने औषध कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली आहे. तसेच ही दरवाढ १२ टक्क्यांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

औषधांच्या किंमतीत सलग दुसऱ्यावर्षी वाढ होत आहे. तब्बल ३८४ औषधं ही अत्यावश्यक औषधांच्या यादीत मोडतात, त्यांना शेड्युल्ड ड्रग्ज असं म्हटलं जातं. याशिवाय उर्वरित नॉन शेड्यूल ड्रग्जच्या किंमती दरवर्षी १० टक्क्यांनी वाढतात. औषधांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढीची मागणी सातत्याने केली जात होती.

- Advertisement -

महागाईत रुग्णांना मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. कारण कच्चा माल, पुरवठा, वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्याने औषधी कंपन्या दरवाढीची मागणी करत होत्या. जानेवारीपासून औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी औषध कंपन्यांनी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आता रोज लागणारी औषधं महाग होणार आहेत.

रोजच्या वापरातील औषधं महाग होणार असल्यामुळे रुग्णांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एप्रिल महिन्याच्या नवीन किंमतीनुसार ग्राहकांवर बोजा पडणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे औषध कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला असून फार्मास्युटिकल सेक्टरला आणि कंपन्यांना यामुळे खर्च भरून निघण्यास मदत होऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा : मी अपशब्द वापरला असेन तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन – संजय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -