घरदेश-विदेशदारूचा एक घोटही ठरू शकतो कर्करोगाचं कारण, WHO ने दिला इशारा

दारूचा एक घोटही ठरू शकतो कर्करोगाचं कारण, WHO ने दिला इशारा

Subscribe

Cause Alcohol Cancer | तुम्ही किती मात्रेत दारू पिता यावरून ती किती सुरक्षित आहे किंवा नाही याचं अनुमान लावता येत नाही. दारूचा एक थेंबही धोकादायकच असतो, असं WHO ने स्पष्ट केलं आहे. 

Cause Alcohol Cancer | नवी दिल्ली – दारूचं व्यसन जडलेल्या आणि कधीतरी दारू पिणाऱ्या तळीरामांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. दारूचा एक थेंबसुद्धा सात प्रकारच्या कर्करोगासाठी कारण ठरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटलं आहे. त्यामुळे दारूचा प्याला ओठाला लावण्याआधी निदान दहावेळा तरी विचार करा. याबाबत लॅन्सेट (The Lancet) या नियतकालिकात जागतिक आरोग्य संघटनेच्या असंसर्गजन्य रोग व्यवस्थापन आणि प्रादेशिक सल्लागार डॉ.कैरिना फरेरा-बोर्गेस यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मद्यप्राशन करणे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे अनेकजण नियमित नव्हे पण निमित्ताने मद्यप्राशन करतात. अशापद्धतीने कधीतरी मद्यप्राशन करणाऱ्या लोकांना आपण धोक्यापासून लांब आहोत, असं वाटत असेल तर जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे डोळे उघडण्याकरता मोठा खुलासा केला आहे. तुम्ही दारूच्या एका घोटाचं प्राशन केलं तरीही तुम्ही कर्करोगोला आमंत्रण दिल्यासारखं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तुम्ही किती मात्रेत दारू पिता यावरून ती किती सुरक्षित आहे किंवा नाही याचं अनुमान लावता येत नाही. दारूचा एक थेंबही धोकादायकच असतो, असं WHO ने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दारू हे एक हानिकारक पेयपदार्थ आहे. यामुळे सात प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. दारूचे प्यायल्याने गळ्याचा कर्करोग, लिव्हरचा कर्करोग, कोलन कर्करोग, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, एसोफैगस कर्करोगाची शक्यता असते. दारूत असलेल्या इथेनॉल बायोलॉजिकल सिस्टम कर्करोगाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही अल्प प्रमाणात दारू प्यायलात तरीही तुम्हाला कर्करोगाचा धोका अटळ आहे. तसंच, दारू प्यायल्यामुळे कर्करोग होईलच असंही म्हणता येणार नाही, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

आठवड्याला दीड लीटरपेक्षा कमी वाईन, साडेतीन लीटरपेक्षा कमी बीअर किंवा ४५० मिलीपेक्षा कमी दारू पिणाऱ्यांना कर्करोगाचं निदान झाल्याचा अहवाल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर, कधीतरी दारू पिणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एवढंच नव्हे तर युरोपात मद्यसेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचेही अहवाल या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे कर्करोगाच्या असह्य वेदनांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर दारूचं व्यसन आताच सोडा.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -