घरदेश-विदेशकोरोनाच्या 2 वर्षानंतरही नागरिकांमध्ये जाणवत आहेत 'या' समस्या; दिल्लीतील एम्सच्या संशोधनातून खुलासा

कोरोनाच्या 2 वर्षानंतरही नागरिकांमध्ये जाणवत आहेत ‘या’ समस्या; दिल्लीतील एम्सच्या संशोधनातून खुलासा

Subscribe

एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली हे संशोधन करण्यात करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध राज्यांमधून 1,800 हून अधिक रुग्णांची निवड करण्यात आली आहे. या रुग्णांशी फोनद्वारे संपर्क साधून आणि त्यांच्या सध्याच्या दिनक्रमाविषयी त्यांना काही प्रश्न विचारले गेले.

कोरोनामुळे(coronavirus) दोन ते अडीच वर्ष सर्व जगचं थांबले होते. पण त्यानंतर मात्र कोरोना विरोधी लस उपलब्ध झाली. या लसीमुळे पुरेश्या प्रमाणात शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करून संसर्ग रोखला गेला. कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण 2 वर्षांनी बरे होऊनही पूर्णपणे सुधृढ झालेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी जी लोकं दोन ते तीन किलोमीटर चालायचे त्यांनाच आता 400 ते 500 मीटर अंतर चालल्यानंतर लोकांना थकवा जाणवू लागल्याच्या समस्या वाढत आहेत. एवढेच नाही तर, अनेकांना निद्रानाश, केस गळणे, धाप लागणे, गुडघेदुखी, सांधेदुखीचा हे सर्व त्रास होऊ लागले. नवी दिल्ली मध्ये असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने कोरोना नंतरच्या परिस्थितीचे सर्वेक्षणाद्वारे क्लिनिकल अभ्यास पूर्ण केला आहे, जो DovPress वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशितही झाला आहे.

हे ही वाचा – जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्याआधी धक्कादायक घटना

- Advertisement -

दरम्यान या अभ्यासात डॉक्टरांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संक्रमित झालेल्या देशाच्या विविध भागातील रुग्णांची निवड केली आणि त्यांच्याशी त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल बोलले गेले. तेव्हा असं अढळलं की, 2020 आणि 2021 मध्ये रुग्णालयात दाखल झालेली लोकं बारी तरी झाली पण त्यांच्या साठी 8 तासांची नोकरी करणे सुद्धा त्यांच्यासाठी आता कठीण होऊन बसले आहे.

1,800 पेक्षा अधिक लोकांवर केले संशोधन

- Advertisement -

एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली हे संशोधन करण्यात करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध राज्यांमधून 1,800 हून अधिक रुग्णांची निवड करण्यात आली आहे. या रुग्णांशी फोनद्वारे संपर्क साधून आणि त्यांच्या सध्याच्या दिनक्रमाविषयी त्यांना काही प्रश्न विचारले गेले. यामध्ये 79.3 टक्के लोकांनी थकवा, सांधेदुखी (33.4%), वाताचा त्रास (29.9%), केस गळणे (29.०%), डोकेदुखी (27.2%), धाप लागणे (25.3%) आणि 25.30 टक्के लोकांनी रात्री झोप न येण्याची समस्या सांगितली. एम्सचे डॉक्टर म्हणाले, ज्यांना कोरोना(coronavirus) झाला होता अशांना रुग्णालयात उपचारादरम्यान जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्स औषधे घ्यावी लागली होती. दरम्यान मोठ्या प्रमाणावर औषधे घेतल्यानेही काही काळाने त्याचा मानवी शरीरावर चुकीचे परिणाम होण्याची सुद्धा शक्यता असते.

हे ही वाचा – सोवा व्हायरस करतोय ग्राहकांचे बँक अकाऊंट मिनिटात रिकामी; SBI चा ग्राहकांचा इशारा

दरम्यान कोरोना (coronavirus)काळात कोरोना लसीच्या माध्यमातून नागरिकांचे प्राण वाचविले गेले. त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या पण करोनाच्या 2 वर्षांनंतरही लोकांना इतर शारीरिक समस्या जाणवत आहेत.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -