घरदेश-विदेशभारत-पाकिस्तानच्या फाळणीवर मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, पाकिस्तानलादेखील 'ही' चूक मान्य

भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, पाकिस्तानलादेखील ‘ही’ चूक मान्य

Subscribe

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही पाकिस्तानमधील लोक आनंदी नाहीत. आता त्यांना मान्य आहे की, भारताची फाळणी ही एक चूक होती, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही पाकिस्तानमधील लोक आनंदी नाहीत. आता त्यांना मान्य आहे की, भारताची फाळणी ही एक चूक होती, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केले आहे. ते क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. देशाच्या विविध भागातील सिंधी समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अखंड भारत हेच सत्य आहे. खंडित भारत एक दु:स्वप्न आहे. भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र पाकिस्तानला दशकांहूनही अधिक काळ लोटला तरी तिथले लोक दु:खी आहेत. परंतु भारतात सुखी आहे. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधी समुदायाला भागवत संबोधित करत होते. यावेळी भागवत म्हणाले की, आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे. आम्हाला भारत पुन्हा उभारायचा आहे. भारत खंडित झाला आहे. आम्ही मनाने तो सोडून द्यावा याची गरज नाही. आमच्यासोबत त्या जमिनीशी नाते कायम राहील. आम्ही सिंधू संस्कृती विसरु शकत नाही. आम्ही सिंध प्रदेशाला विसरणार नाहीत. कारण फाळणी ही कृत्रिम आहे.

- Advertisement -

मोहन भागवत म्हणाले की, भारतासोबत राहण्यासाठी इथे जे आले, त्यांनी पुरुषार्थाने स्वत:ला उभे केले. अखंड भारत हे सत्य आहे. खंडित भारत दु:स्वप्न आहे. भारताला तिथे पुन्हा वसवावे लागेल.

( हेही वाचा: गृहमंत्र्यांच्या कुटुंबातील ब्लॅकमेलिंग प्रकरण स्टंटबाजी नाही का? वाचा, संजय राऊत असं का म्हणाले )

- Advertisement -

मदतीसाठी आरएसएस तप्तर

आदिकालापासून देशाच्या प्रगतीच्या पहिल्या पावलासोबत सिंधू ते सिंधूचा सहभाग राहिल्याचे ते यावेळी म्हणाले. आजही तुम्हाला राहावे लागेल. सुविधांचा काळ सुरु राहील. संपूर्ण जगाला सुख-शांती देणारा भारत हवा आहे. सिंध, सिंधू आणि सिंधी वाढतील आणि चमकतील. चढ-उतार येत राहतील पण आपण प्रयोजनासोबत चालतो. नव्या पिढीला याचे भान हवे. त्यांनी भटकू नये, याची काळजी घ्यावी. सिंधी समाजात पुरुषार्थ मिळतो. आरएसएस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -