Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'भारत' या शब्दाचा 2100 वर्षांपूर्वीचा पुरावा सापडला; 'हाथीगुंफा'सह 'विष्णूपुराणा'तही उल्लेख

‘भारत’ या शब्दाचा 2100 वर्षांपूर्वीचा पुरावा सापडला; ‘हाथीगुंफा’सह ‘विष्णूपुराणा’तही उल्लेख

Subscribe

इंडिया विरुद्ध भारत या वादाचा अंत कधी होणार हे सांगता येत नाही. दरम्यान भारत हा शब्द कलिंगचे राजा खारवेल यांच्या 2100 वर्षांपूर्वी लिहलेल्या हाथीगुंफा या लेखात भारत या शब्दाचा उल्लेख आहे.

नवी दिल्ली : सध्या इंडिया विरुद्ध भारत या दोन शब्दांवर देशातील राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी देशाला भारत या नावाने संबोधित करा असा अट्टाहास पकडून आहेत तर विरोधक मात्र, इंडिया म्हटले तर काय बिघडले यावर अडून आहेत. दरम्यान भारत हा शब्द आला तरी कोठून?, कुणी या शब्दाचा प्रथम प्रयोग केला होता?, हे प्रश्न अनेकांना पडले असतील. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला आता अगदी प्राचीन इतिहासात जाण्याची गरज आहे. चला तर मग माहिती करून घेऊया भारत या शब्दाचे पुरावे कुठे, कुठे आढळतात.(Evidence of the word ‘India’ dates back to 2100 years ago; Also mentioned in ‘Vishnu Purana’ along with ‘Hathigumpha’)

इंडिया विरुद्ध भारत या वादाचा अंत कधी होणार हे सांगता येत नाही. दरम्यान भारत हा शब्द कलिंगचे राजा खारवेल यांच्या 2100 वर्षांपूर्वी लिहलेल्या हाथीगुंफा या लेखात भारत या शब्दाचा उल्लेख आहे. हा सर्वांत प्राचीन पुरावा मानला होता. तर भारत हा शब्द आपल्या पुराणातही आढळून येतो. तो म्हणते विष्णूपुराणत भारताच्या भौगिलिक स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामधे भारत या शब्दाचा उल्लेख आढळून येतो. तो म्हणजे दक्षिणेत समुद्र आणि उत्तरेत हिम पर्वत या दोन्हींच्यामधे असलेली भूमी म्हणजे भारत, आणि येथे राहणारे लोक म्हणजे भारतीय, भारत वंशाचे असा उल्लेख आढळून येतो. सोबतच वैदिक युगात भारतीय वंशामध्ये जन्मलेले दुष्यंत आणि शंकुतलाचा पुत्र भरत यांना या महाद्वीपमध्ये राहणाऱ्या लोकांचा पूर्वज असल्याचे म्हटले जाते. तर ऋग्वेदातील एका उल्लेखानुसार, दुष्यंतचा मुलगा भरत यांच्या नावावरून या भागाला भारत असे नाव पडले. भरत यांनी अश्वमेघ यज्ञ करून या भूमीला जिंकले होते. सोबतच संस्कृतमीधील महाकाव्य महाभारतही याच नावावर आहे. आणि भरतास पांडव आणि कौरवांचा पूर्वजही मानले जाते. महाभारता पाठोपाठ रामायणामधेही भरत हा रामाचा भाऊ तर दशरथ राजांचा मुलगा आहे.

मग इंडिया शब्द कोठून आला?

- Advertisement -

आपण भारत या शब्दाचा पुरावा प्राचिन इतिहासात शोधत असतानाच दरम्यान इंडिया शब्दाचाही शोध घेणे गरजेचे आहे. यामध्ये संस्कृत शब्द सिंधूचे पर्शियन भाषेत हिंदू असे उच्चार केले जाते. असे मानले जाते की, सिंधू या संस्कृत शब्दाला पर्शियन लोकांनी हिंदू म्हटले, त्यामुळे त्याचे नाव पडले. 6 व्या शतकात ईसापूर्व पर्शियन अचेमेनिड साम्राज्याने सध्याच्या सिंधू खोऱ्यातील प्रदेशांवर केलेल्या आक्रमणादरम्यान हिंदू हा शब्द वापरला गेला. पहिल्या शतकापर्यंत म्हणजे पुढच्या 700 वर्षांत त्यात ‘स्टॅन’ हा शब्द जोडला गेला आणि त्याला हिंदुस्थान असे संबोधले जाऊ लागले. हखामनींच्या संपर्कात आल्यावर ग्रीकांनी सिंधू लिहायला सुरुवात केली. अलेक्झांडरच्या भारतावर स्वारीच्यावेळी सिंधू नदीच्या पलीकडे असलेल्या भूभागाला इंडिया म्हटले जाऊ लागले. राज्यघटनेत दोन नावे का?स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात भारताला ‘इंडिया’, ‘भारत’ आणि ‘हिंदुस्थान’ असे संबोधले. हिंदुस्थान हे नाव घटनेत ठेवले नसले तरी इतर दोन नावांचा समावेश करण्यात आला होता.

हेही वाचा : किरीट सोमय्यांचा ‘तो’ कथित VIDEO प्रसारित करणे भोवले; वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल

हखामनींची री मुघलांनी ओढली

- Advertisement -

हखामनी यांनी हिंदूस्थान असा उल्लेख केल्यानंतर 16 व्या शतकात भारतात आलेल्या मुघलांनी हिंदूस्थान हा शब्द वापरला. 18 व्या शतकापर्यंत मुघल सम्राटांनी या शब्दाचा वापर केला. तर इंडिया या शब्दाचा वापर मुघलानंतर आलेल्या इंग्रजानी वापरण्यास सुरूवात केली. त्यांनी भारताच्या भूभागाचे नक्शीकरण करताना इंडिया हाच शब्द वापरला. असे करून ते युरोपमधील ग्रीक आणि रोमन साम्राज्याच्या इतिहासाला जोडू पाहत होते.

हेही वाचा : मोदी सरकारचे इंडिया हटाव! जी-२० डिनर कार्डवर लिहिले प्रेसिडेंट ऑफ भारत

आधी म्हटले काही गरज नाही

भारत सरकारने 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, देशाला इंडियाऐवजी भारत म्हणण्याची गरज नाही. त्यावेळी, देशाचे नाव अधिकृतपणे बदलून भारतीय प्रजासत्ताक करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तेव्हा राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये बदल करण्याचा विचार करण्याची परिस्थिती नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने असेही म्हटले होते की, संविधानाचा मसुदा तयार करताना, संविधान सभेने देशाच्या नावावर व्यापक विचार केला होता. मूळ मसुद्यात भारताचा उल्लेख नव्हता आणि चर्चेदरम्यान भारतवर्ष, भारतभूमी, इंडिया हा भारत आणि भारत हा इंडिया असे म्हणण्यास काहीस हरकत नसल्याचे म्हटले होते.

याआधीही आणला होता प्रस्ताव

काही वर्षापूर्वी काँग्रेसने आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री स्व. मुलायमसिंह यादव आणि विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वांनी राज्यसभा, लोकसभा आणि उत्तर प्रदेश विधानसभेत देशाचे नाव भारत ठेवण्याचा प्रस्ताव विविध प्रसंगी आणला आहे.

- Advertisment -