घरदेश-विदेशEVM : ...ही मनमानी आणि शंभर टक्के हुकूमशाही, ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया

EVM : …ही मनमानी आणि शंभर टक्के हुकूमशाही, ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी ईव्हीएम मशीनचे उत्पादन आणि वितरण करणारी कंपनी आहे. हीच कंपनी या मशीनमध्ये असणाऱ्या चिपसाठी गुप्त कोडही निर्माण करत असते. आधीच ‘ईव्हीएम’वर जनतेचा, देशातील राजकीय पक्षांचा संशय असताना त्या कंपन्यांवर भाजपा पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे आणि ते पदाधिकारीही गुजरातचे असावेत हा योगायोग नसून 2024 च्या महाघोटाळ्याची पूर्वतयारी आहे. ही मनमानी आहे, शंभर टक्के हुकूमशाही आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली आहे.

हेही वाचा – Chandigarh Mayor Polls : 2024च्या निवडणुका कशा होतील याचे प्रात्यक्षिक, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

चंदिगढची एक निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेने ज्यांनी इतका मोठा गुन्हा केला ते देशाची सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी यापेक्षा खालच्या थराला जातील. लोकशाहीविषयी चिंता वाटावी, अशा बातम्या रोज समोर येत आहेत. देशातील निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर म्हणजे मतपत्रिकेवरच घ्याव्यात यासाठी दिल्लीतील वकिलांचे मोठे आंदोलन सुरू आहे. ‘ईव्हीएम’ घोटाळ्याचा सूत्रधार भाजपा आहे आणि घोटाळे करून भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकतात हे त्या वकिलांनी सिद्ध केले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीतही ‘ईव्हीएम’ घोटाळा व चंदिगढप्रमाणे झुंडशाही करून ‘अब की बार चारसौ पार’ची गर्जना सार्थकी लावणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल हा जनतेचा कौल नसून ईव्हीएमचा निकाल आहे व लोकसभेत ईव्हीएमचा सगळ्यात मोठा ‘खेला’ होणार आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : देशाला अश्मयुगाकडे घेऊन जाण्याचा भाजपचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल

निवडणूक यंत्रणा अशा झुंडगिरीने ताब्यात घेऊन सत्ता सदैव आपल्याच हातात ठेवण्याची ही कृती आपल्या महान राष्ट्राला कलंकित करणारी आहे. चंदिगढच्या महापौर निवडणुकीत भाजपाने ‘अंडरवर्ल्ड’ पद्धतीची गुंडगिरीच केली. तेथे सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि आपसारखे पक्ष फोडता आले नाहीत म्हणून आठ मते अवैध ठरवून त्या मतपत्रिकाच पीठासीन अधिकाऱ्याने पळवून नेल्या. लोकशाहीरूपी सीतेचे हे अपहरण आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपणे करून घेण्यासाठीच निवडणूक आयोगास संविधानाने विशेष अधिकार दिले, पण आज निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधारी भाजपाचा महासचिव असल्याप्रमाणे काम करीत आहे. देशभरातील पक्षांतरांना मान्यता देत आहे. आयाराम, गयाराम, पलटूरामांना भाजपामध्ये येण्यासाठी आयोगच निमंत्रित करीत आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाची सरळ पायमल्ली करून पक्ष फोडणाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार करीत आहे, असा संतापही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -