घरदेश-विदेशरामाचे नाव घेऊन संविधानाचे स्मरण करा, कल्याण होईल; माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

रामाचे नाव घेऊन संविधानाचे स्मरण करा, कल्याण होईल; माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

Subscribe

गुवाहाटी येथे आयोजित अखिल भारतीय धर्म संघाच्या शिबिरात गोगोई यांनी हा सल्ला दिला. ते म्हणाले की, देशाच्या विकास हा युवकांची जबाबदारी आहे. युवकांनी प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडायला हवी. तरच देशाला बळकटी मिळेल व देशाचा विकास होईल. 

 

नवी दिल्लीः प्रभू राम व संविधान एकच आहेत. त्यामुळे सकाळी प्रभू रामाचे नाव घ्या व संविधानाचे स्मरण करा. म्हणजे कल्याण होईल, असा सल्ला माजी सरन्यायाधीश व राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांनी दिला आहे. गोगोई यांच्या सल्ल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

गुवाहाटी येथे आयोजित अखिल भारतीय धर्म संघाच्या शिबिरात गोगोई यांनी हा सल्ला दिला. या शिबिरात गोगोई हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले की, देशाचा विकास हा युवकांची जबाबदारी आहे. युवकांनी प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडायला हवी. तरच देशाला बळकटी मिळेल व देशाचा विकास होईल.

अयोध्या प्रकरणाचा निकाल माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला होता. ज्यामध्ये रंजन गोगोई यांच्यासह न्या. एसए बोबडे आणि न्या. डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांचा समावेश होता.

- Advertisement -

त्यानंतर गोगोई यांनी आत्मचरित्र लिहिले. ‘जस्टिस फॉर द जज: एन ऑटोबायोग्राफी’ या आत्मचरित्रात राम जन्मभूमी-बाबरी मशिदीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी गोगोई यांनी लिहिल्या आहेत. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम जन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल जाहिर केल्यानंतर रंजन गोगोई यांनी अन्य न्यायमूर्तींसोबत फाईव्ह स्टार हॉटेल ताज मनासिंहमध्ये डिनर केला होता. त्यावेळी सर्वांसाठी चांगली वाईन ऑर्डर केली होती, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. सेवानिवृत्तीनंतर राज्यसभा सदस्याचा प्रस्ताव स्वीकारताना ते म्हणाले की, मी कोणत्याही राजकीय पक्षात नाही, मला राष्ट्रपतींनी उमेदवारी दिली आहे.

मात्र गोगोई यांनी प्रभू राम व संविधानाची तुलना केल्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाने पत्नी कशी असावे याचे उदाहरण देताना सितेचा उल्लेख केला होता. पत्नी ही सितेप्रमाणे असावी असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. घटस्फोटाच्या खटल्यात न्यायालयाने हे मत नोंदवले होते. त्यावेळीही या मतावर टीका झाली होती.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -