घरदेश-विदेश'आयटम' संसदेने दिलेला शब्द , कमलनाथ यांचा 'द ग्रेट डिफेन्स'

‘आयटम’ संसदेने दिलेला शब्द , कमलनाथ यांचा ‘द ग्रेट डिफेन्स’

Subscribe

नाव आठवल नाही, म्हणून आयटम बोललो

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांचा आयटम म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजप रस्त्यावर उतरली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मौन उपवास ठेवला. तर या संपुर्ण प्रकरणात कमलनाथ यांनी आपल्या आयटम या वक्तव्यावर खुलासा केला आहे. मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री इमरती देवी को आयटम बोलल्या प्रकरणी आता राजकारण अधिकच तापत आहे. आयटम शब्दावरून राजकारण ढवळून निघतानाच आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामध्येच कमलनाथ यांनी या प्रकरणात केलेल्या खुलाशामुळे या संपुर्ण प्रकरणाला नव वळण लागण्याची शक्यता आहे. आपल्या चुकीवर माफी मागण्याएवजी चुकीचे समर्थन करत मोठे स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिल्याने आता हे प्रकरण थांबण्याचे नावच घेत नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

काय म्हणाले होते कमलनाथ ?
माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते की, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा यादीत नमुद होते की आयटम नंबर १, विधानसभेची यादी येते तेव्हा आयटन नंबर १, म्हणून आयटम हा शब्द कोणत्याही चुकीच्या भावनेने वापरलेला नाही. आयटम हा कोणताही अपमान करणारा शब्द नाही. मला त्या प्रसंगी यांचे नाव आठवले नाही. म्हणून मी बोललो की त्या इथल्या आमदार आयटम आहेत.

- Advertisement -

आयटम या शब्दाचा वापर साधारण असतो. आयटम हा संसदेचा शब्द आहे. हा शब्द नेहमी विधानसभेत येतो. आज आपण कोणताही प्रोग्राम पाहताना पाहतो तेव्हा आयटम शब्द सर्सासपणे वापरात येतो. म्हणूनच हा शब्द अपमान करणारा होत नाही. मला समजत नाही. पण त्यांना बोलण्यासारख काहीच नाही. सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रीत करण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कमलनाथ म्हणाले की, आज त्यांनी जनतेचा सामना करावा, आपल्या १५ वर्षांचा हिशोब द्यावा, किती मोबदला दिला, किती कर्ज माफ केले, किती रोजगार दिला याचा. सौदेबाजी आणि बोली लावून सरकार उभ केले आणि गद्दारी झाली. हे लोक मध्य प्रदेशच्या जनतेला मुर्ख समजतात. यांच्याकडे लोकांना सांगण्यासारख काहीच नाही असेही ते म्हणाले.


हे ही वाचा – माजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले आयटम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -