घरताज्या घडामोडी'या' भारतीय क्रिकेटपटूची तब्येत खालावली; जुलैमध्ये झाली होती कोरोनाची लागण

‘या’ भारतीय क्रिकेटपटूची तब्येत खालावली; जुलैमध्ये झाली होती कोरोनाची लागण

Subscribe

कोरोना विषाणूची लागण झालेल्या भारतीय संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांची प्रकृती खालावली आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या भारतीय संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांची प्रकृती खालावली आहे. चेतन यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्यांना आता व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या तेचन चौहान यांना जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लखनऊ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

चेतन चौहान यांच्याविषयी…

चेतन चौहान सध्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहेत. तसेच दोनवेळा त्यांनी माजी खासदार म्हणून काम केले आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले होते. गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९८१ साली चौहान यांना अर्जुन पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.


हेही वाचा – Independance Day : कोरोनाच्या सावटाखाली लाल किल्ल्यावर असा झाला स्वातंत्र्यदिन समारंभ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -