Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : त्रिपाठींचा अर्ज फेटाळला, खर्गे आणि थरूर यांच्यात...

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : त्रिपाठींचा अर्ज फेटाळला, खर्गे आणि थरूर यांच्यात थेट लढत

Subscribe

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्रिपाठींचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे नेते मधुसूदन मिस्त्री यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार आहे.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मधुसूदन मिस्त्री यांनी या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मधुसूदन मिस्त्री हे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. मिस्त्री म्हणाले की, काल एकूण 20 अर्ज जमा झाले. यापैकी स्क्रूटनी कमेटीने 4 अर्ज नाकारले आहेत. त्यांच्या मते या अर्जामध्ये स्वाक्षरीबाबत काही अडचणी होत्या. त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. के.एन.त्रिपाठी यांचा अर्ज निर्धारित निकषांमध्ये बसत नसून स्वाक्षरीशी संबंधित चूक असल्याचे ते म्हणाले. तसेच 8 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याचंही मिस्त्री म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. सोनिया गांधी यांनी खर्गे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, जी-२३ या बंडखोर गटातील नेत्यांनीही खर्गे यांच्या नावाला पसंती दिली असल्याने तेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेहीे वाचा : मल्लिकार्जुन खर्गेंनी सोडलं विरोधी पक्षनेतेपद, सोनिया गांधींकडे सुपूर्द केला राजीनामा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -