घरदेश-विदेशमोदी मंत्रीमंडळातून या मंत्र्यांची गच्छंती

मोदी मंत्रीमंडळातून या मंत्र्यांची गच्छंती

Subscribe

नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत २५ कॅबिनेट आणि ३२ राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मात्र मोदींच्या २०१४ च्या मंत्रीमंडळातील काही चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आलेली नाही. यापैकी अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीमुळे त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच उमा भारती यांनी यावेळी लोकसभा निवडणुकच लढवली नव्हती, त्यामुळे त्यांचाही मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

सुभाष भामरे –

- Advertisement -

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची यावेळी मंत्रीमंडळात वर्णी लागलेली नाही. सोळाव्या लोकसभेत भामरे संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. मात्र यावेळी त्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

सुरेश प्रभू –

- Advertisement -

२०१४ साली शिवसेनेतून आयात करून मोदींनी सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्री केले होते. त्यानंतर त्यांना वाणिज्य खात्याचे मंत्रीपद दिले होते. प्रभू रे राज्यसभेचे सदस्य आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून प्रभू यांची ओळख होती. मात्र यावेळी त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही.

राजवर्धन सिंह राठोड –

माजी सैनिक, ऑलम्पिक पदक विजेते आणि युवक असलेले राजवर्धन हे युवक आणि क्रिडामंत्रालय सांभाळत होते. मोदी यांनी खेलो इंडिया सारखा महत्त्वाचा उपक्रम राठोड यांच्याकडे दिला होता. तसेच मै फिट तो इंडिया फिट हे अभियान देखील त्यांनी सुरु केले होते. मात्र यावेळी त्यांच्याकडे दुसरी जबाबदारी देणार असल्याचे कळते.

राधामोहन सिंह –

मागच्या सरकारमध्ये ज्यांच्या कार्यक्षमेतवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असे माजी कृषि मंत्री राधामोहन सिंह यांना देखील मंत्रीमंडळात घेतलेले नाही.

जे. पी. नड्डा –

अमित शाह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद कोण घेणार? असा प्रश्न निर्माण होतो. जे.पी. नड्डा कदाचित भाजपचे अध्यक्ष होऊ शकतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांना यावेळी मंत्रीपद देण्यात आलेले नाही. नड्डा हे मागच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम पाहत होते.

मनेका गांधी –

महिला व बाल विकास राहिलेल्या मनेका गांधी या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मुस्लिम नागरिक मला मतदान करत नाहीत, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे कामे घेऊन येऊ नयेत, असे वक्तव्य केल्यामुळे त्या अडचणीत आल्या होत्या. मनेका यांची यावेळी मंत्रीमंडळात वर्णी लागलेली नाही.

जयंत सिन्हा –

झारखंड राज्यातील हजारीबाग येथून खासदा म्हणून निवडून आलेले जयंत सिन्हा देखील यावेळी मंत्रीमंडळात नाहीत. भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचे ते सुपुत्र आहेत. जयंत यांनी सोळाव्या लोकसभेत अर्थ आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

हंसराज अहिर –

चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या सुरेश धानोरकर यांनी पराभव केला. अहिर हे सोळाव्या लोकसभेत गृह राज्यमंत्री होते. पराभवामुळे त्यांचा यावेळी मंत्रीमंडळात समावेश नाही.

अनंत गीते –

खासदार अनंत गीते हे शिवसेनेचे एकमेव खासदार मोदी मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यांच्याकडे अवजड उद्योग खात्याचा भार देण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी गीते यांचा पराभव केला. त्यामुळे अनंत गीते देखील मंत्रीमंडळात नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -