घरदेश-विदेशमनमोहन सिंहही म्हणतात, 'तर गव्हर्नरने राजीनामा द्यावा'

मनमोहन सिंहही म्हणतात, ‘तर गव्हर्नरने राजीनामा द्यावा’

Subscribe

केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या स्वायत्ततेच्या वादावर आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचीही भूमिका समोर आली आहे. यामध्ये त्यांनी आरबीआयला अर्थमंत्र्यांच्या निर्देशांनुसारच वागावं लागलं असं मत व्यक्त केलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमध्ये आता माजी पंतप्रधान आणि एकेकाळी रिझर्व्ह बँकचे गव्हर्नरपद सांभाळलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंह यांचीही भूमिका समोर आली आहे. इतकंच नाही, तर त्यांची ही भूमिका आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या विरोधातली आणि भाजप शासित केंद्र सरकारच्या बाजूची आहे. त्यामुळे भाजप सरकारला विरोध करणाऱ्या सर्वच विरोधकांच्या दाव्यांमधली हवाच निघाली आहे. नुकतंच देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन आरबीआय गव्हर्नर रामा राव यांना पाठवलेल्या पत्रातूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांचंच महत्त्व अधोरेखित केलं गेल्याचं स्पष्ट झालं होतं.

मनमोहन सिंग – स्ट्रिक्टली पर्सनल

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंगांची भूमिका महत्त्वाची ठरते. मनमोहन सिंग यांची मुलगी गुरुशरण कौर यांच्या स्ट्रिक्टली पर्सनल या पुस्तकामध्ये सिंग यांनी केंद्र सरकार/अर्थमंत्री आणि आरबीआयचे गव्हर्नर यांच्यातले संबंध कसे असायला हवेत? याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – RBIने सिद्धूसारखे नाही तर द्रविडसारखे काम करावे – रघुराम राजन


मनमोहन सिंग यांच्यामते, ‘आरबीआय गव्हर्नरला केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आदेश पाळणं भाग असतं. कारण अर्थमंत्री हे कधीही आरबीआय गव्हर्नरपेक्षा वरच असतात. गव्हर्नरला आपलंच खरं करता येत नाही. आणि शक्य नसल्यास गव्हर्नरने राजीनामा द्यावा’.

मनमोहन सिंगांनीही दिला होता राजीनामा

मनमोहन सिंग यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जाते. कारण मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान, देशाचे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशी तिनही पदं सांभाळली आहेत. त्यामुळे या तीन पदांमधला सहसंबंध ते इतरांपेक्षा जास्त जाणून आहेत. १९८३ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मनमोहन सिंग आरबीआयचे गव्हर्नर होते. तेव्हाही सरकार आणि आरबीआयमध्ये वाद झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी थेट राजीनामा दिला होता. मात्र, तेव्हा त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता.

- Advertisement -

हेही वाचा  – नेहरूंच्या ‘त्या’ पत्रामुळे काँग्रेसची गोची!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -