लुधियाना : पंजाबचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ अकाली नेता जगदीश सिंह गरचा, पत्नी, बहिण आणि अन्य सदस्य बेशुद्ध करून नौकराने घर लुटले. जगदीश सिंह यांच्यासह कुटुंबियांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन महिन्यापूर्वीच कामावर ठेवलेल्या नेपाळी नौकरांनी त्यांच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केला आहे.
जगदीश सिंग गरचा, त्यांची पत्नी जगजीत कौर, बहीण आणि मोलकरीण रेणू पक्खोवाल रोडवरील महाराजा रणजित सिंग घरात राहतात. तीन महिन्यांपूर्वी जगदीश सिंग गरचा यांनी एका नेपाळी नोकराला कामावर ठेवले होते. तर रेणू जवळपास 12 वर्षांपासून काम करत असून ती त्यांच्या घरी राहते. असे म्हणतात की एक नेपाळी नोकर रोज सर्वांसाठी जेवण बनवत असे.
नेपाळी नोकराने साथीदारांसोबत घर लुटले
नेपाळी नोकरने रविवारी गरचा कुटुंबियांच्या जेवणात अमली पदार्थ मिसळले आणि सर्वांना खाऊ घातल्यानंतर तो स्वतः आत गेला. सर्वजण बेशुद्ध झाल्यावर नोकराने साथीदारांना घरात बोलावून लुटले. आरोपींनी घरातील प्रत्येक कपाटाची झडती घेतली. रोख रक्कम, दागिने व इतर मौल्यवान ऐवज लुटून ते पळून गेले.
हेही वाचा – तर्रर्र दारूची नशा- तोंडी अश्लील भाषा; BJP च्या नेत्याचा रस्त्याच्या मधोमध हायव्होल्टेज ड्रामा
भाजप नेते जगमोहन शर्मा म्हणाले…
भाजप नेते जगमोहन शर्मा यांनी सांगितले की, “जगदीश सिंह गरचा यांच्या घरी अनेक दिवसांपासून बांधकाम सुरू आहे. सकाळी कामगार आले. पण कोणीही दरवाजा उघडला नाही. यानंतर ड्रायव्हरने सांगितले की, सर्वजण बेशुद्ध पडले होते आणि जगदीश सिंह गरचा यांचे शरीर थंड पडले होते.” पुढे जगमोहन शर्मा सांगितले की, मी जेव्हा ते घरात पोहोचले, तेव्हा त्यांना सर्व सामान्य लोकांनी जगदीश सिंह गरचा घर विखुरलेले दिसले आणि सर्व लोक बेशुद्धावस्थेत पडले होते.”
पोलीस आयुक्त काय म्हणतात?
पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिद्धू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नोकराच्या फोटोचा शोध घेत आहेत. तसेच परिसरातील काही दुकाने व इतर ठिकाणी कॅमेरे तपासले जात आहेत. गरचा यांचा मुलगा बॉबीसह पोलीस काही ठिकाणी जाणार आहेत. ते म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात या नोकराने रात्री वेगवेगळ्या वेळी सर्वांना जेवण दिल्याचे समोर आले आहे. जेवल्यानंतर कुटुंबिय बेशुद्ध झाले.
हेही वाचा – मुलीला वडिलांशी भेटू दिले नाही तर फ्लॅटच्या मालकी हक्क…; मुंबई उच्च न्यायालयाची महिलेला तंबी
नेमके काय घडले
जगदीश सिंह गरचा यांच्या घरी बांधकाम सुरू आहे. यामुळे बांधकामासाठी मजूर घरी पोहोचले असता ही चोरीची घटना उघडकीस आली. या मजूर कामासाठी घरी आले असताना दरवाजा बंद असल्याचे दिसले. तेव्हा मजूराने आवाज दिल्यानंतरही घरचा दरवाजा उघडला नाही. यामुळे मजूर हे बाहेरच बसून राहिले. तेव्हा जगदीश सिंह गरचा यांचा ड्रायव्हर घरी पोहोचल्यावर त्यांनी मजूरांनी त्यांनी ही गोष्ट सांगितली. यानंतर ड्रायव्हरने बघितली की, घरातील एक खिडकी उघडी होती. या खिडकीतून ड्रायव्हरने आवाज दिला कोणीही उत्तर दिले नाही. यानंतर चार जण बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळून आले.
यानंतर ड्रायव्हरने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. जगदीश सिंह गरचा यांचे दोन घरे सोडून भाजप नेते जगमोहन शर्मा यांचे घर आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांना दिली. त्यांनी महानगरातील सर्व अधिकार्यांना फोन केला. पण कोणीही फोन उचलला नाही, असा आरोप त्यांनी केला. माहिती दिल्यानंतर तासाभरात पोलीस आल्यावर त्यांनी कारवाई सुरू केली. आश्चर्याची बाब म्हणजे जगदीश सिंह गरचा यांना रुग्णालयात नेहण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली असता. ती देखील आली नाही. लोकांनी प्रत्येकाला त्यांच्या वाहनांतून गरचांच्या कुटुंबियांना रुग्णालयात नेले. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.