घरदेश-विदेशगुगलवरून बँक हेल्पलाईन नंबर घेणे पडले महागात, हिमाचलमधल्या माजी सैनिकाला २० लाखांचा...

गुगलवरून बँक हेल्पलाईन नंबर घेणे पडले महागात, हिमाचलमधल्या माजी सैनिकाला २० लाखांचा गंडा

Subscribe

हिमाचल मधील दिवाण चंद या माजी सैनिकाला गुगलवरून बँक हेल्पलाईन(helpline number) नंबर घेणे महागात पडले आहे. या सैनिकाच्या बँक खात्यातून तब्बल २० लाख रुपये लंपास केले आहेत.

सध्या नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध असल्याने बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होतो. नेट बँकिंगची(net banking) जेवढी सुविधा आहे तेवढेच त्याचे काही वेळा दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. किंवा काही वेळा बँकेच्या खातेदारांना बँकेच्या नावे निनावे फोन आणि मेसेज सुद्धा येतात आणि काही वेळा लोक या निनावी फोन(fake call) आणि मेसेजना लोक बाली पडतात. याचाच प्रत्यय हिमाचल मधील एका माजी सैनिकाला आला आहे. हिमाचल मधील दिवाण चंद या माजी सैनिकाला गुगलवरून बँक हेल्पलाईन(helpline number) नंबर घेणे महागात पडले आहे. या सैनिकाच्या बँक खात्यातून तब्बल २० लाख रुपये लंपास केले आहेत.

हे ही वाचा – प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला अटक, मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

- Advertisement -

हिमाचल(himachal pradesh) मधील नायगार पंचायतीच्या मुरुडा या गावात राहणाऱ्या दिवाण चंद या माजी सैनिकाला फसवुन २० लाखांना गंडा घातला. हे सैनिक याच वर्षी ३१ जानेवारी रोजी भारतीय नौदलातून निवृत्त झाले. गुगल वरून बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घेणेहे माजी सैनिकाला महागात पडले आहे. सायबर क्राईम गुन्हेगारांनी माजी सैनिकाच्या बँक खात्यातून मोठी रक्कमी सुद्धा लंपास केली. ही धक्कादायक घटना हिमाचल प्रदेश मधीलबिलासपूर येथे घडली आहे. दरम्यान या संदर्भातील गुन्हा बिलासपूरच्या तलाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा – अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआय न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

- Advertisement -

हाती आलेल्या माहितीनुसार, हे माजी सैनिक ३१ जानेवारी रोजी भारतीय नौदलातून निवृत्त झाले होते. हरीमपूर जिल्ह्यातील पीएनबीच्या हरसौर शाखेत त्यांचे बँक खाते आहे. त्यांनी त्यांच्या पेन्शनची माहिती घेण्यासाठी नेट बंकिंग(net banking)  सुविधा सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकाला विनंती केली होती. तेव्हा बँक मॅनेजरने सांगितले कि तुम्ही स्वतः नेट बँकिंग ऑनलाईन(online banking) पद्धतीने करू शकता.

हे ही वाचा –  नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणाऱ्यांना ऑनलाईन धमक्या; आत्तापर्यंत अनेकांना अटक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -