घर देश-विदेश माजी केंद्रीय मंत्री विजेंद्र पाल सिंह यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी केंद्रीय मंत्री विजेंद्र पाल सिंह यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विजेंद्र पाल सिंह यादव यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची मुलगी पिंकी यादव सध्या संभल जिल्ह्यातील असमोली विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या आमदार आहेत. विजेंद्र पाल सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच सपा आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर संभळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजेंद्र पाल यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरु झाला. ते राज्य सरकारमध्ये मंत्री होते, तसेच ते काँग्रेसचे खासदारही राहिले होते. चार दिवसांपूर्वी पोटात संसर्ग झाल्याने त्यांना सिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी त्यांना ह्रदयविकाराचे दोन झटके आले त्यानंतर त्यांचे निधन झाले.

असा आहे होता त्यांचा राजकीय प्रवास

- Advertisement -

विजेंद्र पाल सिंह यादव यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. बहजोई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते संभळचे खासदार झाले, यानंतर ते 1985 मध्ये बहजोई येथून काँग्रेसचे आमदार निवडून आले आणि 1987 मध्ये मंत्री झाले. 1989 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण 1991 मध्ये पुन्हा ते काँग्रेसमधून आमदार झाले. यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. 1996 मध्ये समाजवादी पक्षातून आमदार झाले. विजेंद्र पाल हे उत्तर प्रदेश बेव्हरेज फाऊंडेशनचे अध्यक्षही होते.

विजेंद्र सिंग हे समाजवादी पक्षाचे मुराराबादचे जिल्हाध्यक्षही होते. 2011 मध्ये सपानी त्यांच्या नेतृत्त्वाखाली बसपा सरकारच्या विरोधात निदर्शने केली. महामार्ग रोखल्याप्रकरणी विजेंदर पाल यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सपा सरकार आल्यावर हे खटले मागे घेण्यात आले.


- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -