Video: लॉकडाऊन संपवा, ‘घरात पती दिवसरात्र देतोय त्रास’; महिलेची व्यथा

लॉकडाऊनमुळे पती घरात असल्याने सतत सेक्सची मागणी करत आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपवा, अशी मागणी एका महिलेने सरकारकडे केली आहे.

exhausted with never ending sex demand woman appeals to lift lockdown
फोटो प्रातिनिधिक आहे

देशात लॉकडाऊन असल्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्य सध्या घरी आहेत. तर अनेक जण घरुन काम करत आहेत. तर काहींना घरुन काम करणे शक्य नसल्यामुळे त्यांना दिवस कसा घालवावा असा देखील प्रश्न पडू लागला आहे. तर अनेक लोक दिवसरात्र घरात राहत असल्याने घरातील समस्या वाढू लागल्या आहेत. तसेच कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. तर अनेक विचित्र समस्या ही समोर येत आहेत.

एका महिलेने सरकारकडे लॉकडाऊन लवकर संपवण्याची विनंती केली आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे पती सतत शारीरिक संबंधाची मागणी करतो. पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधाच्या मागणीला वैतागलेल्या महिलेने तिचे दु:ख व्यक्त केले आहे. सध्या सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या महिलेने लॉकडाऊन संपवण्याची सरकारकडे मागणी केली असून ही महिला आफ्रिकन देश घानामधील आहे.

पतीला कामावर पाठवा

या महिलेने सांगितले आहे की, ‘झोपेतून उठत नाही तर पती शारीरिक संबंधासाठी तयार असतो. त्याचे झाले की, त्याच्यासाठी जेवण करा नंतर पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी करतो. पुन्हा शारिरिक संबंध…लॉकडाऊन शारीरिक संबंधासाठी आहे का? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे?’ असा सवाल या महिलेने उपस्थित केला आहे.

दरम्यान, या महिलेने अनेक महिलांच्या समस्येला वाचा फोडली आहे. तिने सरकारकडे मागणी केली आहे की, तुम्ही लॉकडाऊन तरी संपवा नाहीतर पतीला कामावर तरी बोलवा. माझा पती मला खूप त्रास देत आहे. त्यामुळे आता या महिलेच्या समस्येला वाचा फोडली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.

५०० हून अधिक लोक कोरोनाबाधित

घानामध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर ८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आफ्रिकी देशांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.


हेही वाचा – देशातील पाच राज्यांच्या वटवाघळांमध्ये आढळला कोरोना विषाणू