घरदेश-विदेशExit polls : कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा बहुतांश सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Exit polls : कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा बहुतांश सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Subscribe

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज, बुधवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल शनिवारी, 13 मे रोजी जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वी वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स तसेच संस्थांनी घेतलेले एक्झिट पोल (Exit polls) समोर आले आहेत. यातील बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला (Congress) सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, काहींनी भाजपाच्या (BJP) बाजूने जनतेचा कौल मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे.

झी न्यूजच्या (Zee News) एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 224पैकी 103 ते 118 जागा मिळतील. तर, भाजपला 79 ते 94 जागा आणि जेडीएसला 25 ते 33 जागा मिळू शकतात. 2 ते 5 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. एबीपी-सी व्होटरच्या (ABP-C Voter) मते, काँग्रेस बहुमताच्या जवळ असेल. काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळू शकतात. तर भाजपला 83 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला (JDS) 21 ते 29 जागा आणि इतरांना (Others) 2 ते 6 जागा मिळू शकतात.

- Advertisement -

टाइम्स नाऊ (Times Now) एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसला बहुमत मिळू शकते. काँग्रेसला 113 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजपाला 85 जागा मिळू शकतात. जेडीएसला 23 जागा मिळू शकतात. इंडिया टुडे – अॅक्सिसच्या (India Today-Axis) एक्झिट पोलनुसार काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 122 ते 140 जागा मिळतील. तर भाजपला 62 ते 80 तर जेडीएसला 20 ते 25 जागा मिळू शकतात.

- Advertisement -

न्यूज नेशनच्या (News Nation) एक्झिट पोलनुसार भाजपा कर्नाटकात स्वबळावर सरकार बनवेल. भाजपाला 114 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 86 जागा मिळू शकतात. जेडीएसच्या खात्यात 21 जागा आणि इतरांना तीन जागा मिळतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे, एशियानेट सुवर्णा न्यूजने (Asianet Suvarna News) देखील भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असेल असा अंदाज वर्तविला आहे. भाजपाला 94 ते 117 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला 91 ते 106 तर जेडीएसला 14 ते 24 जागा मिळू शकतात. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी पक्षाला 113 जागांची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -