कोरोना विषाणूचं औषध पहिल्या चाचणीत अयशस्वी; अहवाल झाला लीक

या अयशस्वी चाचणीचा अहवाल अचानक जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला होता. यामध्ये या औषधाने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि हे औषध प्रभावी ठरलं नाही, असं या अहवालावत म्हटलं होतं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं हा अहवाल साइटवरुन हटवला आहे.

gilead

कोरोना विषाणूच्या औषधासंदर्भात अनेक प्रयोग आणि चाचण्या सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांवर अँटीव्हायरल रेमडीसिविर औषधाचा वापर केला जात होता. दरम्यान, याबाबतचा अहवाल समोर आला आहे. हे औषध पहिल्या क्लिनिकल चाचणीत अयशस्वी झालेलं आहे. यापूर्वी अशी आशा व्यक्त केली जात होती की कोविड -१९ च्या उपचारात रेमडीसिविर प्रभावी सिद्ध होईल, मात्र हा दावा खोटा ठरला आहे. या अयशस्वी चाचणीचा अहवाल अचानक जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला होता. यामध्ये या औषधाने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि हे औषध प्रभावी ठरलं नाही, असं या अहवालावत म्हटलं होतं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं हा अहवाल साइटवरुन हटवला आहे. या अहवालाने लोकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. दरम्यान, हे औषध बनवणारी अमेरिकेची गिलिड सायन्स (Gilead Science) कंपनीने हा दावा नाकारला आहे.

अभ्यासात काय आहे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या क्लिनिकल ट्रायल डेटाबेसमध्ये रेमडीसिविर औषध चाचणी असफल झाल्याचा तपशील प्रसिद्ध झाल्यानंतर ही बातमी लवकर पसरली. तथापि, हा अहवाल WHO ने काढून टाकला आहे. त्याचबरोबर WHO हा अहवाल चुकून अपलोड केल्याची पुष्टी केली आहे.


हेही वाचा – …तर सॅनिटायझरचं इंजेक्शनच मारा; ट्रम्प यांचा डॉक्टरांना अजब सल्ला


या अहवालानुसार, संशोधकांनी २३७ रुग्णांवर अभ्यास केला. यापैकी १५८ रूग्णांना रेमडीसिविर औषध देण्यात आलं आणि त्यांची तुलना उर्वरीत रुग्णांशी केली गेली ज्यांना प्लेसबो देण्यात आला. एका महिन्यानंतर, रेमडीसिविर घेतलेल्या रूग्णांपैकी १३.९ टक्के लोकांचा मृत्यू झाला. या औषधाच्या दुष्परिणामांमुळे लवकरच त्याचं परीक्षण थांबवलं गेलं.

कंपनी काय म्हणते?

गिलिड कंपनीने (Gilead Science) WHO ने शेअर केलेली पोस्ट नाकारली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं, “आम्हाला वाटतं की हा अभ्यास अयोग्य पद्धतीने शेअर करण्यात आला आहे.” हा आकडेवारीनुसार योग्य नव्हता आणि लवकरच डीलीट करण्यात आला. प्रवक्ता पुढे म्हणाला, “या अभ्यासाचे निर्णायक निकाल अजून येणे बाकी आहेत. तथापि, आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की कोरोना रूग्णांमध्ये ज्यांना प्रारंभिक उपचारातच रेमडीसिविर देण्यात आलं होतं, त्यांना याचा फायदा झाला आहे.” रेमडीसिविर हे औषध इबोलाच्या उपचारात वापरलं होतं.

याआधी शिकागो मेडिसिन विद्यापीठाच्या संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, कोविड-१९ च्या १२५ रूग्णांना रेमडीसिविर हे औषध दिल्यानंतर त्यांच्या तब्येतीत जलद सुधारणा झाली आहे. त्याच वेळी, गिलिड सायन्स कडून रेमडीसिविर औषधाच्या क्लिनिकल चाचण्या देखील चालू आहेत.