घरCORONA UPDATECovaxin आणि Covishield च्या Mixing dose संशोधनास मंजूरी, लवकरच ट्रायल

Covaxin आणि Covishield च्या Mixing dose संशोधनास मंजूरी, लवकरच ट्रायल

Subscribe

भारतात कोरोनाविरोधी लसींच्या मिक्सिंग डोसच्या (Mixing dose) चाचणीला लवकरचं सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (CDSCO) तज्ज्ञांच्या एका समितीने कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोव्हिशील्ड (Coveshield) लसींचे मिक्सिंग ट्रायलला मंजूरी देण्याची शिफारस केली आहे.

यासाठी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (CMC) वेल्लोर यांनी दोन्ही लसींच्या इंटरचेंजबिलिटी स्टडी प्रोटोकॉलसाठी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडे (SEC) मंजुरीसाठी अर्ज केला आहे. याशिवाय एसईसीने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि एडेनोवायरस इंट्रानेजल वॅक्सिन (BBV154) च्या इंटरचेंजेबिलिटी स्टडी प्रोटोकॉलच्या ट्रायलच्या मान्यतेसाठी शिफारस केली आहे. यावर समितीने भारत बायोटेकने आपल्या संशोधनाच्या शीर्षकातून इंटरचेजबिलिटी हा शब्द हटवत सुधारित प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

ट्रायल यशस्वी झाल्यास दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणे होईल शक्य 

या संशोधनातून एखादया व्यक्ती दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले जाऊ शकते का? हे जाणून घेण्यास मदत होईल. या संशोधनासाठी ३०० लोकांवर प्रयोग केला जाणार आहे. म्हणजेच एका व्यक्तीला कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाईल आणि त्यानंतर काय परिणाम दिसून येतील यावरही अभ्यास केला जाईल.

CDSCO ने मुलांच्या लसीकरणासंबंधीत सेफ्टी डेटा मागवला

CDSCO च्या तज्ज्ञांच्या समितीने बोयोलॉजिकल-ईकडून ५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासंबंधीत सेफ्टी डेटा मागितला आहे. तसेच एका डोसनंतर समितीने इम्युनोजेनिसिटी डेटावर देखील चर्चा केली. बायोलॉजिकल-ईने लहान मुलांच्या लसीकरणसाठी फेज २ आणि ३ च्या क्लिनिकल ट्रायलसाठी अर्ज केला होता. परंतु कंपनीला प्रौढांवर केलल्या ट्रायलचा सेफ्टी आणि इम्युनोजेनेसिटी डेटा CDSCOला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

जॉन्सन अँड जॉन्सनने सिंगल डोस लसीचा प्रस्ताव घेतला मागे

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (J&J) सिंगल डोस लसीच्या फेज -3 च्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी देण्याबाबत चर्चा करणार होती. परंतु कंपनीने आपला प्रस्ताव आता मागे घेतला आहे. तिसऱ्या फेजमध्ये कंपनीने दोन वयोगटातील ६०० लोकांवर त्यांच्या लसीचे क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये १८ ते ५९ आणि ६० वर्षांवरील लोकांचा समावेश होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -