घरताज्या घडामोडीCorona Vaccination: २ ते १८ वयोगटातील चाचण्यांसाठी Covaxin लस वापरा; तज्ज्ञांकडून शिफारस

Corona Vaccination: २ ते १८ वयोगटातील चाचण्यांसाठी Covaxin लस वापरा; तज्ज्ञांकडून शिफारस

Subscribe

देशभरात सध्या कोरोना लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसत आहे. यामुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान आता २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

- Advertisement -

सध्या हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस कोरोना विरोधातील लढाईत प्रभावी ठरत आहे. कंपनीकडून ही लस ८१ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारत बायोटेकची लस प्रभावी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला गेला आहे. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या अनुषंगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी कोवॅक्सिन लसीचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्सिट्यूट, दिल्ली तसेच पाटण्यातील एम्ससह अनेक ठिकाणी केली जाणार आहे.

यापूर्वी भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोवॅक्सिनला मंजूरी देण्याची विनंती केली होती. याबाबत मंगळवारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (Cdsco) कोरोना विषयक समितीने बैठक घेऊन विचारविनिमय केला. मग त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोवॅक्सिनचा वापर करण्याची मंजूरी देण्याची शिफारस समितीने केल्याचे समोर आले.

- Advertisement -

हेही वाचा – 18 ते 44 वयोगटासाठीचे डोस आता 45 वर्षांवरील लोकांसाठी; राज्य आरोग्य विभागाचा निर्णय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -