Explosion in Kabul: काबूलमध्ये तालिबानच्या सरकारी सैनिकांवर बॉम्बहल्ला, ९ जण जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानच्या सरकारी सैनिकांच्या गाडीला टार्गेट करत बॉम्बहल्ला घडवून आणला आहे. या हल्लामुळे ९ जण जखमी झाले असून दोन सैन्य जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयातून देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असता काबुलमध्ये हल्ला घडवून आला आहे, असं त्यांनी म्हटलंय. जेव्हा सैनिकांच्या गाडयांचा ताबा काबुलच्या परिसरातून जात होता. तेव्हा अचानक बॉम्बहल्ला करण्यात आला. यावेळी या हल्ल्यात काबुलच्या पोलीस जिल्हयातील परिसरात ९ जणांसह सुरक्षा दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

सोमवारी झालेल्या हल्ल्यात लहानग्यांचा मृत्यू

काल(सोमवार) अफगाणिस्तानच्या पाकिस्तानी सीमेवर जबरदस्त स्फोट घडवून आणला होता. यामध्ये काही लहान मुलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नगरहार प्रांतात खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका गाडीने जुन्या मोटार्सच्या गाडीला धडक दिल्यामुळे हा स्फोट झाला. नगरहार राज्यातील लोलापार जिल्ह्यात हा स्फोट झाल्याची माहिती तालिबानच्या गव्हर्नर कार्यालयाने दिली आहे.

अफगाणची सत्ता पूर्णपणे तालिबानच्या हातात

१५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता स्वतःच्या हाती घेतली होती. अफगाणिस्तानची सत्ता पूर्णपणे तालिबानच्या हातात आल्यानंतरही अफगाणिस्तानात अनेक हल्ले झाले आहेत. इस्लामिक स्टेट अफगाणिस्तान सरकारपासून वेगळे आहे. त्यामुळेच इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानात अनेक हल्ले करत असल्याचं समजलं जात आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात राजधानी काबूलमध्ये भीषण स्फोट झाला होता. या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच राजधानीला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं. या सर्व हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा : UP elections 2022 : माझा राजीनामा भाजपला धक्का देण्यासाठी पुरेसा – स्वामी प्रसाद मौर्य