घरदेश-विदेशगेट परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ

गेट परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ

Subscribe

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ७ ऑक्टोबर तर विलंब शुल्कासह १२ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज. इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी देशपातळीवर आयोजित होणाऱ्या गेट परीक्षांचे नियोजन यंदा आयआयटी मुंबईमार्फत केले जात आहे.

लॉकडाऊन आणि कोविड १९ च्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांकडून गेट परीक्षेच्या मुदतवाढीची मागणी करण्यात येत होती. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत अर्ज नोंदणीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयआयटी मुंबईकडून घेण्यात आला आहे. इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी  देशपातळीवर आयोजित होणाऱ्या गेट परीक्षांचे नियोजन यंदा आयआयटी मुंबईमार्फत केले जात आहे. ११ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या गेट परीक्षांच्या अर्ज नोंदणीची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे.
 
गेट ऑनलाईन एप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टम या पोर्टलवरून गेट परीक्षेसाठी नोंदणी करताना आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ३० सप्टेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार होती. आता दिलेल्या मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ७ ऑक्टोबर तर विलंब शुल्कासह ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नोंदणी करता येणार आहे. यंदाची गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३ ,१४ फेब्रुवारी २०२१ या तारखांना सकाळ आणि दुपार अशा २ सत्रांत पार पडणार आहे.  देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता या तारखांत बदल होऊ शकतो हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -