घरताज्या घडामोडीNEET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षेला मिळणार अधिक वेळ

NEET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षेला मिळणार अधिक वेळ

Subscribe

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) या परीक्षेचा कालावधी २० मिनिटांनी वाढवला आहे.

जुलैमध्ये नीट यूजी २०२२ (NEET UG 2022) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १८ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता थोडाफार दिलासा मिळणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) या परीक्षेचा कालावधी २० मिनिटांनी वाढवला आहे. पूर्वी या परीक्षेला १८० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता, आता नव्या टाईम मॅनेजमेंटनुसार (Time Management) हा कालावधी २०० मिनिटे करण्यात आला आहे.

३ विषयांच्या अ आणि ब या सेक्शनसाठी देशभरातील नीट तज्ज्ञांनी २०० मिनिटांच्या पेपरचा टाईम मॅनेजमेंटचा चार्ट (Time Management Chart for NEET) तयार करण्यात आला आहे. हा चार्ट फॉलो केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेत पूर्ण करता येणार आहे.

- Advertisement -

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (National Testing Agency) घेण्यात येणारी ही परिक्षा यंदा भारतातील सर्वांत कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा असणार आहे असं म्हटलं जात आहे. म्हणूनच १८० मिनिटांच्या या पेपरला २०० मिनिटे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या टाईम मॅनेजमेंटनुसार जीवशास्त्र हे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रात विभागले गेले आहे. खंड ए आणि बीसाठी प्रति १ एमसीक्यूसाठी १.५ मिनिटापेक्षा जास्त वेळ न घेण्याची सूचना देण्यात आली आहे. जेणेकरून सेल डिव्हिजन, बेसिक्स ऑफ जेनेटिक्स आणि मेंडेलिअन जेनेटिक्स या विषयांचे संख्यात्मक अभिमुखता यासारखे मोठे प्रश्न सोडवायला वेळ मिळू शकेल.

- Advertisement -

तसेच, प्रकाशसंश्लेषण, जैवतंत्रज्ञान अशा विषयांवर आधारित आकृती आधारित जुळणी, प्रतिपादन कारण आणि निवेदनावर आधारित प्रश्न दर दीड मिनिटांनी सोडवण्याचे सुचवण्यात आले आहे. तज्ञांद्वारे भौतिकशास्त्रात, गणना केंद्रित एमसीक्यू, जे बहुतेक सेक्शन बीमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रति एमसीक्यू २ मिनिटे असल्याचे सूचविले जाते. त्याचबरोबर सेक्शन ए चे ३५ एमसीक्यू १ मिनिटापेक्षा कमी वेळात करण्यास सांगण्यात आले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -