पैसे जमा करण्यासाठी ‘ही’ बँक लावणार एक्स्ट्रा चार्ज ; १ जानेवारीपासून लागू होणार नियम

जर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे कस्टमर आहात तर, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जानेवारी २०२२ पासून खातेदाराला एका लिमिटपेक्षा अधिक पैसे काढण्यासाठी आणि डिपॉजिट करण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने दिलेल्या माहितीनुसार, बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून प्रत्येक महिन्याला ४ वेळा कॅश काढणे हे फ्री असणार आहे. मात्र त्यानंतर ग्राहकांना बँकेत पैसे काढताना आणि जमा करताना ग्राहकांना २५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये चार्ज न भरता महिन्याला १०,००० रुपये जमा करु शकता. IPPB ने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे की, या १०,००० रुपयांच्या लिमिटपेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने ग्राहकांना अतिरिक्त चार्ज मोजावे लागेल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ३ प्रकारचे अकाउंट खोलले जातात.त्यात बेसिक सेव्हिंग अकाउंट,सेव्हिंग अकाउंट याचे वेगवेगळे नियम आहेत.बँकमध्ये ज्या ग्राहकांचे बेसिक सेव्हिंग अकाउंट आहे ते कोणतेही चार्ज न भरता खात्यातून ४ वेळा कॅश काढू शकतात.मात्र त्यानंतर अधिकवेळा कॅश काढल्यावर ग्राहकांना ०.५० टक्के चार्ज द्यावा लागेल. हे सर्व नियम १ जानेवारीपासून, एक लिमिटनंतर पैसे जमा करण्याने आणि पैसे काढण्याने चार्ज लावण्यात येईल.


हेही वाचा – केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारींना परत बोलवावे, नसीम खान यांची मागणी