घरताज्या घडामोडीVideo: पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करण्याचे सत्र सुरुच; कराचीत कट्टरपंथीयांकडून दुर्गा मूर्तीची...

Video: पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करण्याचे सत्र सुरुच; कराचीत कट्टरपंथीयांकडून दुर्गा मूर्तीची विटंबना

Subscribe

पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला करण्याचे सत्र सुरू आहे. पाकिस्तानच्या कराचीत कट्टरपंथीयांनी यावेळेस नरियन पोरा हिंदू मंदिरावर हल्ला केल्याचे समोर आले. यावेळी दुर्गा मूर्तीची कट्टरपंथीयांनी विटंबना केली. पाकिस्तानी पत्रकार वीनगास यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या २२ महिन्यातील हा हिंदू मंदिरावरील ९ मोठा हल्ला आहे.

पाकिस्तानी पत्रकार वीनगास म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेली नोटीस असून आणि सरकारकडून मंदिरांची संरक्षणासाठी केलेला दावा असून २२ महिन्यात हिंदू मंदिरावर हा ९वा हल्ला झाला आहे. जेव्हा आरोपींना मुक्तपणे राहण्यास परवानगी दिली जाते, तेव्हाच असे घडते. यापूर्वी पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत.’

- Advertisement -

दरम्यान काही वर्षांपासून पाकिस्तानमधील कंट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हिंदू मंदिरांवरील हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये गणेश मंदिरावर कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पंजाब राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महानिरीक्षकांना तात्काळ बोलावण्यात आले होते. तर याप्रकरणी पंतप्रधान इमरान खान यांनी घटनेच्या २४ तासात निवेदन देऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन दिले. तसेच इमरान खान यांनी आयजी पंजाब यांना सर्व दोषींना अटक करण्याचे आदेश दिले होते.इमरान खान ट्वीट करत म्हणाले की, ‘मी गणेश मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.’

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानमध्ये बु्द्धमूर्तीची विटंबना


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -