चीनला टक्कर देण्यासाठी तैवानकडून लढाऊ विमान सज्ज, जाणून घ्या फायर पॉवर

तैवानने चीनला टक्कर देण्यासाठी लढाऊ विमान सज्ज करण्यात आले आहे. काही वेगवान आणि लढाऊ विमानांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. सक्रिय क्षेपणास्त्रांनी भरलेले हे लढाऊ विमान अत्यंत प्राणघातक दिसत आहे. चीनच्या सुरू असलेल्या डावपेचांना प्रत्युत्तर म्हणून तैवानने हे केले आहे. तैवानने आपली युद्ध सज्जता तपासण्यासाठी रात्री त्याचे लढाऊ विमान उडवले. F-16V असे या लढाऊ विमानाचे नाव आहे.

तैवानची राजधानी तैपेई, चीनविरुद्ध युद्ध झाल्यास लढाऊ विमानांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या विमानांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. तैवानच्या हवाई दलाच्या जवानांनी F-16V फायटर जेट क्षेपणास्त्रांनी सुसज्ज केले आहे. या लढाऊ विमानावर अमेरिकेने बनवलेले जहाजविरोधी क्षेपणास्त्र लोड करण्यात आले होते.

बुधवारी रात्री तैवानच्या सहा F-16V लढाऊ विमानांनी उड्डाण केले. दरम्यान या विमानांची तपासणी करण्यात आली असून प्रशिक्षणाचे काम करण्यात आले आहे. हवाई दलाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्वत्र रणांगण आहे. त्यामुळे या विमानांचं प्रशिक्षण कधीही केलं जाऊ शकतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही लढाऊ विमानं फार महत्त्वाची आहेत. संपूर्ण तैवान बेट हा चीनचा असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.

तैवान आपल्या जुन्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात सातत्याने सुधारणा करत आहे. बीजिंगकडून लष्करी कारवाईचा धोका कमी करण्यासाठी ते आपल्या संरक्षण आणि आक्रमक शस्त्रांवर सतत काम करत आहेत.


हेही वाचा : आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर छापा, कोट्यवधीच्या मालमत्तेचं घबाड