फेसबुकच्या प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टची होणार तपासणी

भारतामध्ये लोकप्रिय असलेली फेसबुक ही सोशल साइट अडचणीत सापडली आहे. पून्हा एका पासवर्ड डेटा चोरीला गेला आहे. त्यामुळे फेसबुकवरील प्रत्येक पोस्टची तपासणी केला जाणार असल्याचे समोर येत आहे.

face book will come to users home for enquiry
फेसबुकच्या प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टची होणार तपासणी

तरूणांपासून वृद्धांपर्यंत लोकप्रिय मानली जाणारी फेसबुक ही सोशल साइट अडचणीत सापडली आहे, असे दिसत आहे. फेसबुक सोशल साइट मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीची आहे. फेसबुक यूजर्सचे पून्हा एकदा पासवर्ड डेटा चोरीला गेला आहे. ही घटना पुन्हा एकदा घडली आहे, त्यामुळे फेसबुकवर यूजर्सने जी पोस्ट करेल ती प्रत्येक पोस्ट आता तपासली जाणार आहे. तसेच तपासणी करण्यासाठी आता फेसबुकने घरो घरी माणसे पाठवण्याचे काम सुरू केल्याचे दिसत आहे. काही दिवसांपासून फेसबुकवर चांगलाच टीकेचा मारा होत आहे. भारतामध्ये फेसबुक यूज करणाऱ्यांचा व्हेरिफिकेशन करायची वेळ फेसबुकवर आली आहे.

फेसबुककडून घरोघर जाऊन चौकशी

फेसबुक या सोशल साइटच्या प्रतिनिधींनी अलिकडेच यूजर्सच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. त्या यूजर्सकडे त्याचे ओळखपत्र आणि आधार कार्ड पाहण्याची मागणी केली होती. या यूजरने काही दिवसापूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक राजकीय पोस्ट केली होती, त्यामुळे फेसबुकचे प्रतिनिधीकडून त्या यूजरची चौकशी करण्यात आली होती.

यूजर्सच्या प्रायव्हसीचे उल्लंघन

दरम्यान, फेसबुकवर पोस्ट केल्याने यूजर्सची तपासणी करायला फेसबुकचे प्रतिनिधी घरोघरी पोहचत आहेत. त्यामुळे आता ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट-२०००’अन्वये फेसबुकची ही क्रिया म्हणजे सरळ सरळ यूजर्सच्या प्रायव्हसीचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.