Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'मेटा'कडून Whatsapp मध्ये लवकरच फेसबुक बटण होणार उपलब्ध; काय आहेत फायदे

‘मेटा’कडून Whatsapp मध्ये लवकरच फेसबुक बटण होणार उपलब्ध; काय आहेत फायदे

Subscribe

नवी दिल्ली : संवादाचे सर्वात लोकप्रिय माध्यम असलेल्या व्हॉट्सऍपमध्ये (Whatsapp) आता नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. यामुळे व्हॉट्सऍपवर ठेवलेले स्टेटस आता फेसबुकवर (Facebook) शेअर करता येणार आहे.

सध्याच्या काळात संवादाचे लोकप्रिय आणि वेगवान माध्यम असलेल्या व्हॉट्सऍपमध्ये मेटा कंपनीकडून नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे. व्हॉट्सऍप आपल्या युजर्सना नेहमीच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यात आता व्हॉट्सऍपमध्ये फेसबुक बटण देण्यात आले आहे. हे बटण माय स्टेटससह दिसत असलेल्या शेअर आयकॉनसह दिसेल. या बटणावर टॅप केल्यानंतर युजर्स आपले व्हॉट्सऍप स्टेटस आता फेसबुकवरही शेअर करू शकणार आहेत.

- Advertisement -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरी फेसुबक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम हे ‘मेटा’ या एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत. मेटाकडून इन्स्टाग्राम युजर्ससाठी त्यांची स्टोरी फेसबुकवर शेअर करण्याचा सोपा पर्याय देण्यता आला होता. असाच पर्याय आता व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससाठीही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सऍप स्टेटस प्रमाणेच आता फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टोरी देखील २४ तासांसाठी शेअर करता येणार आहे. व्हॉट्सऍपच्या नव्या सुविधेनुसार आता व्हॉट्सऍप स्टेटस आपोआप फेसबुकवर शेअर होणार आहे. यासाठी फेसबुक सेटिंगमध्ये एनॅबल हा पर्याय उपलब्ध होणार आहे. आपले सर्व सोशल प्लॅटफॉर्म्स परस्परांशी जोडण्याचा मेटाचा हा प्रयत्न आहे.

पुढील काही आठवड्यांत सर्वांना होणार उपलब्ध
‘फेसबुक बटण’ या फीचरची सुविधा सर्व युजर्सना लवकरच मिळणार आहे. यासाठी पुढील काही आठवड्यांत सर्व युजर्सना व्हॉट्सऍप अपडेट करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल. नवीन अपडेट प्राप्त होताच युजर्सना सेटींगमध्ये जाऊन स्टेटस शेअरिंग एनॅबल करावे लागेल. हे सेटींग करताना आपले स्टेटस आपल्या मित्रांपैकी कोणाला दाखवायचे आणि कोणाला नाही दाखवायचे हे ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य युजर्सला देण्यात आले आहे.

- Advertisement -

फेसबुक बटणची सेटींग कशी करावी
1. व्हॉट्सऍपचे नवीन अपडेट आल्यानंतर युजर्सना सर्वात आधी स्टेटस टाकावे लागेल आणि त्यानंतर सेटींगमध्ये पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
2. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस शेअर केल्यानंतर फेसबुक स्टोरी सेक्शनमध्ये शेअर करण्याचा सोपा पर्याय ‘सेट-अप’ करता येईल.
3. ‘सेट-अप’ पर्यायावर टॅप केल्यानंतर स्क्रीनवर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल.
4. पर्याय सेट केल्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही व्हॉट्सऍपवर कोणतेही स्टेटस शेअर करणार ते फेसबुक स्टोरीमध्ये आपोआप दिसणार आहे. जर तुम्हाला व्हॉट्सऍप स्टेटस फेसबुकवर शेअर करायचे नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार डिसेबल पर्यायाची निवड करू शकता.

- Advertisment -