घरताज्या घडामोडीभाजप नेत्यांच्या पोस्टकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावर Facebook चं अखेर स्पष्टीकरण!

भाजप नेत्यांच्या पोस्टकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावर Facebook चं अखेर स्पष्टीकरण!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर भाजपला झुकतं माप दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि भडकाऊ पोस्टकडे फेसबुककडून जाणूब बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देखील फेसबुक आणि व्हॉट्सअॅपर भाजपचं नियंत्रण असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर फेसबुकचे उपाध्यक्ष अजित मोहन यांनी फेसबुकची बाजू मांडली आहे. या वादामध्ये पहिल्यांदाच जाहीरपणे फेसबुकची बाजू सोशल मीडियावर आली असल्यामुळे Ajit Mohan यांच्या या खुलाशाला महत्त्व आलं आहे. या वादावर फेसबुकची बाजू मांडण्यासाठी अजित मोहन यांनी एक सविस्तर ब्लॉगच लिहिला आहे.

काय म्हटलंय या ब्लॉगमध्ये?

Facebook ची बाजू मांडताना अजित मोहन म्हणतात, ‘फेसबुक कोणत्याही पक्षाचं किंवा विचारसरणीचं समर्थन करत नाही. ते एक सगळ्यांसाठी खुलं, पारदर्शी आणि निष्पक्ष व्यासपीठ आहे. तिथे सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आमच्यावर जे काही आरोप केले जात आहेत, त्यावर फेसबुक गांभीर्याने विचार करत असून अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा आम्ही निषेधच करतो’. भाजप नेत्यांच्या पोस्टकडे दुर्लक्ष करण्यासाठी फेसबुकने आपल्या Hate Speech Rules ला बगल दिल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये केला होता दावा

काही दिवसांपूर्वी Wall Street Journal मध्ये छापून आलेल्या एका लेखामध्ये फेसबुककजून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पोस्टकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. तेव्हापासून या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपविरोधी आणि फेसबुकविरोधी मोहीमच सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -