घरअर्थजगतफेसबुकच्या मूळ कंपनीत मोठी कर्मचारी कपात; कमाईतील तूट भरून काढण्यासाठी निर्णय

फेसबुकच्या मूळ कंपनीत मोठी कर्मचारी कपात; कमाईतील तूट भरून काढण्यासाठी निर्णय

Subscribe

नवी दिल्ली – एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. आता असाच निर्णय फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटानेही घेतला आहे. बुधवारी मेटा प्लॅटफॉर्म इंकने ही मोठी घोषणा केली आहे. कंपनीतील १३ टक्के कर्मचाऱ्यांची म्हणजेच ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा – दिल्लीसह देशातील ‘या’ राज्यांत ‘अमूल बटर’चा तुटवडा; सोशल मीडियावर तक्रारींचा पूर

- Advertisement -

निराशाजनक कमाई आणि कमाईतील घट भरून काढण्यासाठी 11,000 हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती मेटाने दिली. मेटाच्या इतिहासात मी केलेला हा सर्वात कठीण बदल आहे, अशी कबुली मार्क झुकरबर्ग यांनी केली.

मेटा ही टेकविश्वातील सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीत काम करण्यासाठी अनेक कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. जगभरातील अनेक चतुर कर्मचारी मेटामध्ये असल्याने मेटा कंपनी तोट्यात असू शकेल, असा कोणी विचारही केला नसेल. सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्स मेटा कंपनीकडून असूनही या कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. म्हणूनच, या कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तरच भारताचा विकस होईल; अदानी, अंबानी यांचा उल्लेख करत अमिताभ कांत यांचं विधान

टेकविश्वातील हा या वर्षातील सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरसह टेक दिग्गजांमध्ये नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे, परंतु मेटाच्या 18 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे पाऊल उचलले गेले आहे. मेटाच्या रेव्हेन्यूमध्ये त्याच्या मूल्याच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त गमावले आहे. यापुढे अधिक भांडवल कार्यक्षम बनविण्यावर मेटाचा भर असेल. तर, Metaverse प्रकल्प पुढे नेण्यावर भर दिला जाईल

कर्मचारी कपात पण कर्मचाऱ्यांचा विचार

  • १८ वर्षांत पहिल्यांदाच मेटामध्ये एवढी मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे.
  • काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना ६ आठवड्यांचा मूळ पगार मिळेल.
  • ६ महिन्यांचा आरोग्यसेवेचा खर्चही मिळेल.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -