घरटेक-वेकFacebook New Name: Facebook च्या नावात बदल, बदलामागे 'हे' कारण?

Facebook New Name: Facebook च्या नावात बदल, बदलामागे ‘हे’ कारण?

Subscribe

जगप्रसिद्ध फेसबुक कंपनीने आपल्या नावात रातोरात बदल केला आहे. त्यामुळे Facebook Inc कंपनी आता नव्याने ओळखी जाणार आहे. अनेक दिवसांपासून फेसबुक आपल्या नावात बदल करणार अशा चर्चा रंगत होत्या. परंतु खुद्द फेसबुक कंपनीनेच नाव बदल करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. फेसबुकने आपल्या नव्या नावाची घोषणा केली आहे. Facebook कंपनीचे नाव बदलून meta (मेटा) असं केलं आहे. कंपनीने ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. फेसबुकचे नाव बदलल्यानंतर त्याच्या लोगातही बदल झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे फेसबुकला आता पुढे ‘मेटा’ या नावाने ओळखले जाईल. फेसबुक सध्या सोशल मीडियापुरतं मर्यादित न राहता अनेक क्षेत्रात पुढे जाण्याची तयारी करत आहे. यातच १८ ऑक्टोबरला फेसबुकने युरोपमध्ये १० हजार जणांसाठी नोकरी संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. ज्यामाध्यमातून कंपनीला मेटावर्स तयार करता येईल. मेटावर्स म्हणजे ज्यात रिॲलिटी आणि व्हर्च्युअल वर्ल्ड यांचा मेळ पहिल्यापेक्षा कैकपटींनी अधिक असतो. तसेच व्हर्च्युअल रिॲलिटीची पुढची पायरी असल्याचे म्हटले जाते. ज्याद्वारे मीटिंग, सफरिंग, गेमिंग अशी कितीतरी कामे करता येतात. त्यामुळे कंपनीकडून मेटावर्सकडे भविष्यासाठीची मोठी गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. मेटा हे सोशल कनेक्शनचं पुढचं पर्व असल्याचंही फेसबुक अर्थात मेटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. फेसबुकने त्यासाठी फ्रान्समध्ये ऑग्मेंटेड रिॲलिटी रिसर्च लॅब सुरू केली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी कंपनीने AR (augmented reality) आणि VR (virtual reality) चीफ आंद्रे बोसवर्थ यांना चीफ टेक्नोलॉजी आधिकारी म्हणून बढती देण्याची घोषणा केली. यातच फेसबुकने VR आणि AR मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामाध्यमातून जवळपास तीन अरब यूजर्सला जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नाव बदलण्यामागे कारण?

अमेरिकेच्या संसदेत फेसबुकवरून झालेल्या वादंगानंतर फेसबुक कंपनीने नाव बदलण्याची घोषणा केली असे म्हटले जाते. अमेरिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी फेसबुक कंपनीवर जाहीर राग व्यक्त केला होता. याचदरम्यान फेसबुक कंपनीने आपल्या नावात बदल करण्याची योजना आखली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -