घरदेश-विदेशतांत्रिक बिघाडामुळे फेसबुकवरील ‘ब्लॉक’ युजर्स झालेत ‘अनब्लॉक’

तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकवरील ‘ब्लॉक’ युजर्स झालेत ‘अनब्लॉक’

Subscribe

मार्क झुकेरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील फेसबुकने सोमवारी दिलेल्या माहिती वरुन आठ लाख युजर्सला याचा फटका बसला आहे.

तुम्ही जर फेसबुक वापरत असाल आणि तुम्ही कोणाला ब्लॉक केले असेल तर एकदा पुन्हा ब्लॉकलिस्ट तपासून बघा. फेसबुकमध्ये झालेल्या बिघाडामुळे ब्लॉकयुर्जर्स अनब्लॉक झाले असल्याची माहिती आज फेसबुकने जाहीर केली. तांत्रिक बिघाडामुळे ही स्थिती निर्माण झाली असून हा बिघाड आता दुरुस्त करण्यात आलेला आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार याचा फटका ८ लाख युजर्सला पडला आहे. युजर्सच्या ब्लॉक सूचीत असलेली खाती अचनाक अनब्लॉक झाली होती. २९ मे ते ५ जून दरम्यान हा बिघाड झाला होता. याचुकीसाठी फेसबुकच्या अधिकाऱयांनी दिलगीरी व्यक्त केली व भविष्यात असे होणार नसल्याची हमी दिली आहे.

काय आहे ब्लॉक सूची?  

- Advertisement -

आपल्या पोस्ट किंवा फोटोज नको असलेल्या युजर्सने बघू नये यासाठी फेसबुकमध्ये ब्लॉकचा पर्याय दिलेला आहे. या पर्यायामुळे आपले खाते समोरच्या व्यक्तीला दिसत नाही. आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या व्यक्तीला ब्लॉक केल्यास ती अनफ्रेंड होऊन जाते. फेसबुकवर बहूतांश युजर्स या पर्यायाचा वापर करतात. ब्लॉक पर्याय वापरण्याची अनेक कारणे आहेत. अशा प्रकारे ब्लॉक पर्याय निघाल्याने अनेक युजर्सची गौरसोय झाली होती. बिघाडा दरम्यान ब्लॉक केलेला युजर फेसबुकच्या मेसेंजरने संबधित व्यक्तीला मेसेज करु शकत होता. काही युजर्सला फेसबुककडून ब्लॉक सूची तपासण्याचे मॅसेज आले होते. ब्लॉक केलेल्या युजर्सने मॅसेज पाठवल्याने फेसबुक वापरणाऱयांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

केंब्रिज अॅनालिटिका घोटाळाप्रकरणी युजर्सची खाजगी माहिती विकण्याच्या आरोप युरोपियन संसद आणि यूएस कॉंग्रेसद्वारे फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग वर केला जात आहे. २०१६ ला अमेरिकेच्या निवडणूकीदरम्यान युजर्सची माहिती विकण्याचे प्रकरण सुरु असतानाच ब्लॉक युजर्स अनब्लॉक होणे ही घटना फेसबुकला मोठा धक्का देऊ शकते.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती देताना फेसबुकच्या मुख्य गोपनीयता अधिकारी एरिन इगन यांनी सांगितले आहे की,“फेसबुकवर कोणाला ब्लॉक करण्याचे महत्व आम्हाला माहिती आहे. झालेल्या बिघाडाबाबत आम्ही माफी मागतो. कोणालाही ब्लॉक करणे म्हणजे त्या व्यक्तीपासून आपल्या माहितीची सुरक्षा करणे होय. ब्लॉक करण्याचे अनेक कारणे असू शकतात. धमकावणे, छळ करणे किंवा त्रास देणे यामधील तीन मुख्य कारणे आहेत. मात्र बिघाड आता सुधवरण्यात आलेला आहे. फेसबुक हे त्याच्या युजर्ससाठी नेहेमीच सुरक्षित आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -