घरदेश-विदेशफेसबुकचा मोठा निर्णय, राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर स्पेशल ट्रिटमेंट होणार बंद

फेसबुकचा मोठा निर्णय, राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर स्पेशल ट्रिटमेंट होणार बंद

Subscribe

नेत्यांना अमर्यादीत अधिकार मिळालेले नाहीत

फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकच्या सोशल मीडिया साईट्सवर नेत्यांना मिळणारी स्पेशल ट्रिटमेंट बंद होणार आहे. यापूर्वी फेसबुकच्या मालकीच्या सोशल नेटवर्किंग साइटवरील नेत्यांना काही नियमांमधून सूट दिली जात होती. परंतु मार्क झुकरबर्ग यांनी आता सोशल मीडियावरून राजकीय नेते आणि पक्षांसंदर्भातील वादग्रस्त धोरण संपवण्याचा विचार केला आहे. या धोरणासंदर्भात बोलताना कंपनीने असा युक्तिवाद केला की, राजकीय नेत्यांची विधाने स्वाभाविकपणे वृत्तपत्रातील बातमीच्या लायक असतात. ही विधाने लोकांच्या हिताच्या दृष्टीने आक्षेपार्ह, धमकी देणारी किंवा विवादास्पद का असेना. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटबद्दल देखील काय निर्णय घ्यावा यासंदर्भात फेसबुक विचार करत आहे.

फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट केले अनिश्चित काळासाठी बंद 

फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ६ जानेवारी २०२० रोजी अनिश्चित काळासाठी बंद केले होते. त्यामुळे ट्रम्प यांना आता त्यांच्या सोशल मीडियावर कोणताही पोस्ट करता येत नाही. परंतु फेसबुकच्या या बदलांसदर्भातील पहिली बातमी तंत्रज्ञानासंदर्भात बातम्या देणाऱ्या द वर्ज ने दिली होती यानंतर न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन टाईम्सने याला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

फेसबुक बातमी योग्य सवलती धोरणाच्या माध्यमातून २०१६ पासून राजकीय नेत्यांना सूट देत होते. परंतु २०१९ मध्ये या धोरणाने लोकांचे लक्ष वेधले गेले जेव्हा कंपनीचे जागतिक विषय आणि प्रसारण मंडळाचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी घोषणा केली की, नेत्यांनी दिलेली विधाने सर्वसाधारण नियम म्हणून “रिपोर्टिव्ह मटेरियल” म्हणून पाहिली जातील. परंतु ही विधाने सामान्य नियमांप्रमाणे पाहू आणि ऐकले जाऊ शकतात अशी असली पाहिजेत.

त्यानंतर फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की “जर एखाद्याचे विधान किंवा पोस्ट विशिष्ट्य समुदायिक मानदंडांचे उल्लंघन करत असेल आणि ते विधान आपल्या हानीच्या जोखमीच्या पलीकडे जाऊन लोकांच्या हिताचे असेल तर आम्ही अद्याप आमच्या व्यासपीठावर त्यांना परवानगी देऊ.”

- Advertisement -

नेत्यांना अमर्यादीत अधिकार मिळालेले नाहीत

परंतु, यामुळे नेत्यांना अमर्यादीत अधिकार मिळालेले नाहीत. जानेवारीत फेसबुकने ट्रम्प यांचे खाते बंद केले तेव्हा अमेरिकेच्या कॅपिटल (संसद भवन) येथे त्यांच्या या निर्णयाच्या बाजूने “हिंसा आणि भडकावणे” असे नमूद केले. परंतु ट्रम्प यांच्या कोणत्याही पोस्टसाठी बातमी योग्य सवलत धोरणाचा वापर केला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. फेसबुकने मात्र यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला.


राज्यातील १५ टक्के ऑक्सिमीटर मशीन निकृष्ट दर्जाच्या- CGSI


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -