घरदेश-विदेशफेसबुक करणार सर्वात मोठी टाळेबंदी, मेटाच्या 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार 

फेसबुक करणार सर्वात मोठी टाळेबंदी, मेटाच्या 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार 

Subscribe

नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकची पालक कंपनी असलेली मेटा कंपनी आतापर्यंतची सर्वात मोठी टाळेबंदी करण्याच्या तयारीत आहे. फेसबुक आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे समजते. एवढेच नाही तर येत्या काही दिवसांत मेटा आणखी 5000 ओपन नोकऱ्यांच्या योजनेलाही कात्री लावणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असून ५० हजार कर्मचाऱ्यांची भरतीही आता होणार नाही आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील डिजिटल कलेक्‍टिबल्ससह मेटा आपले काम बंद करत असल्याचे एका अहवालात सांगण्यात आले आहे. द व्हर्ज मधील एका अहवालात असे म्हटले आहे की, मेटा इंस्टाग्रामवर एनएफटी तयार करण्यासोबतच विक्री करण्याच्या त्याच्या चाचण्या थांबवणार आहे. यासोबतच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एनएफटी शेअर करण्याची वापरकर्त्यांची क्षमता देखील अक्षम करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- तरुणांनी रेल्वे स्थानकावर फेकला ड्रम, आत जे काही दिसलं ते पाहून सगळेच हदरले

मेटा कॉमर्स आणि फिनटेक लीड, स्टीफन कासरील यांच्या ट्विटर थ्रेडनुसार कंपनी “निर्माते, लोक आणि व्यवसायांना समर्थन देण्याच्या इतर मार्गांवर” लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच मेटा अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल जिथे कंपनी मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडू शकेल. ज्यामध्ये मेसेजिंग आणि रीलवरील कमाई आणि मेटा पेमध्ये सुधारणा करणार असल्याचे कासरील म्हणाले.

- Advertisement -

मेटाने ऑगस्ट 2022 मध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकला एनएफटी समर्थनाची घोषणा केली होती. मात्र अलीकडे मेटाने यूएसमधील फेसबुक आणि इंस्टाग्राम निर्मात्यांसाठी रील्स प्ले बोनस बंद केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेटा कंपनीवर त्याच्या क्लाउड युनिट Azure चा वाढीचा दर कायम ठेवण्यासाठी दबाव आहे. त्यामुळे गेल्या काही तिमाहीपासून पर्सनल कॉम्प्युटर्स मार्केटला मंदीचा फटका बसला आहे. याचा परिणाम मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि उपकरणांच्या विक्रीवर झाला आहे. तसेच, गेल्या वर्षी जून तिमाहीच्या अखेरीस कंपनीकडे सुमारे 2,21,000 कामगार होते. त्यापैकी सुमारे 1 लाख 22 हजार कामगार यूएस आणि उर्वरित इतर देशांमध्ये होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -