फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांचा राजीनामा; कंपनीने सांगितले कारण…

अजित मोहन जानेवारी 2019 मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून फेसबुक इंडियामध्ये सामील झाले होते.

मेटा (फेसबुक) कंपनीचे इंडिया हेड अजित मोहन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या म्हणण्या प्रमाणे अधिक उत्तम संधी शोधण्यासाठी अजित मोहन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लवकरच अजित मोहन नव्या सोशल मीडिया प्लँटफॉर्म आपली सेवा सुरु करू करण्याची शक्यता आहे. असेही कंपंनीने म्हटले आहे. (Facebook’s India head Ajit Mohan resigns; The company said the reason)

मेटा (फेसबुक) चे इंडिया हेड अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. कंपनीने सांगितले की, अजित मोहन यांनी अधिक उत्तम संधी शोधण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Facebook-parent Meta's India head Ajit Mohan steps down

हे ही वाचा –  ‘जीपीएफ’साठी आता वर्षाला पाच लाखांची मर्यादा; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

अजित मोहन जानेवारी 2019 मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून फेसबुक इंडियामध्ये सामील झाले होते. येथे काम करताना, कंपनीने भारतात 200 दशलक्षहून अधिक युजर्स WhatsApp आणि Instagram ला जोडले गेले.

मेटा या कंपनीत येण्यापूर्वी अजित मोहन यांनी स्टार इंडियाच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्षे काम केले होते.

हे ही वाचा –  एलॉन मस्कचा दणका; आजपासून ट्विटरची कर्मचारी कपात सुरू