घर टेक-वेक फेसबुकचा पासवर्ड तत्काळ बदला, १० लाखांहून अधिक वापरकर्त्यांचा डेटा लीक

फेसबुकचा पासवर्ड तत्काळ बदला, १० लाखांहून अधिक वापरकर्त्यांचा डेटा लीक

Subscribe

नवी दिल्ली – सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अॅप्स सर्वाधिक धोकादायक ठरण्याची चिन्ह आहे. भारतासह जगभरात फेसबूक हे सोशल मीडिया अॅप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मात्र, या सोशल मीडियावरील वापरकर्त्यांची माहिती असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. जवळपास ४०० अॅप्सने या फेसबूकवरील ग्राहकांचा डेटा चोरला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे फेसबूक वापरणाऱ्या वापरकर्त्यांनी तत्काळ आपला पासवर्ड बदलण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येतंय.

शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल १० लाखांहून अधिक फेसबूक युजर्सचा डेटा लीक झाला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांचा पासवर्डचाही समावेश आहे. डेटा लिकप्रकरणी मेटाने आतापर्यंत ४०० हुन अधिक अॅप्सची ओळख पटवली आहे. यामध्ये फोटो एडिंटीग करणारे अॅप्स, व्हिपीएन सेवा देणारे अॅप, गेमिंग अॅप, या थर्ड पार्टी अॅप्सचा समावेश आहे. डेटा चोरी करणारे हे अॅप्स गुगल आणि अॅपलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

- Advertisement -

कसा चोरला जातो डेटा

अनेकदा आपण इतर अॅप वापरताना त्याचे फिचर्स वापरता यावेत याकरता फेसबूक अकाऊंटचा अॅक्सेस देतो. समजा, एखादा फोटो एडिटिंगचा अॅप वापरायचा असेल तर अॅप कंपनी तुम्हाला तुमच्या फेसबूक अकाऊंटचा अॅक्सेस मागते. यासाठी तुमचा इमेल आयडी आणि पासवर्ड मागितला जातो. ही फेसबूकची माहिती या थर्ड पार्टी अॅपकडून चोरली जाते. त्यामुळे कोणत्याही अॅपला फेसबूक डेटाचा अॅक्सेस देताना सावधानता बाळगा.

- Advertisement -

या अॅप्सपासून सावधान

FB Advertising Optimization, Business ADS Manager, Ads Analytics, FB Adverts Optimization, FB Analytic, FB Adverts Community, Adverts Ai Optimize, Very Business Manager, FB Business Support, Fb Ads, Meta Optimizer, Business Manager Pages, Adverts Manager, Meta Adverts Manager, Ad Optimization Meta, FB Pages Manager, Business Ads, Meta Business, Business Suite Manager, FB Ads Cost, Adverts Bussiness Suite, Business Ads Clock, Ads & Pages, Business Suite, Business & Ads, Business Manager Overview, Business Suite Ads, Page Suite Manager, Business Meta Support, Pages Manager Suite, Business Meta Pages, Business Suite Ads, Ads Business Knowledge, Page Suite Managers, Pages Managers Suite, Ads Business Advance, Pages Manager Suite, Business Suite Optimize, Business Manager Suite, Business Suite Managers, Ads Business Manager, Ads Business Suite, Business Manager Pages, Business Adverts Manager, Ads Manager Suite, Business Manager Pages, Ads & Business Suite.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -