घरCORONA UPDATEFact Check: लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाचा धोका? केंद्राने दिले स्पष्टीकरण

Fact Check: लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाचा धोका? केंद्राने दिले स्पष्टीकरण

Subscribe

देशात कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. यात कोरोनाचा नव्या व्हेरियंटमुळे अनेकांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहे. दरम्यान या कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी आता लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. आत्तापर्यंत १३ कोटीहून अधिक नागरिकांनी कोरोनाविरोधी लस घेतली परंतु या लसीकरणानंतरही काहींना कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खरचं लसीकरणानंतर कोरोना संसर्ग होतो का यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

लसीकरणानंतरही कोरोना संसर्ग होतो ?

भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB)ने अधिकृत ट्विटरवरून लसीकरणानंतर कोरोना होतो का यावर स्पष्टीकरण दिले आहे. यावर PIB ने सांगितले की, होय, लसीकरणानंतर काहींना कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. परंतु लसीकरणानंतर फार कमी टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. अनेकांनाची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह येत आहे परंतु त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. असे सरकारने म्हटले आहे.

- Advertisement -

परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. कारण ०.०३ – ०.०४ टक्केच लोकांनाच कोरोना विषाणूचा संपर्कात येत आहेत. परंतु त्यांना अतिशय सौम्य लक्षणे जाणवत आहेत. परंतु लसीमुळे कोरोना विषाणूचे गंभीर परिणाम जाणवत नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्य़ाचे पीआयबीने स्पष्ट केले.

जागतिक आरोग्य संघटना यावर काय सांगते ?

यावर जागतिक आरोग्य संघटनेने (world health organization)नमूद केले की, कोरोना लसीकरणानंतर अनेक लोक आजारी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु केंद्राने मंजुरी दिलेल्या कोणत्याही लसीमध्ये कोरोना विषाणू पसरण्यास कारणीभूत घटक नाहीत, त्यामुळे कोरोनाविरोधी लस आपल्याला कोरोना संसर्ग होण्यापासून बचाव करत आहे. लसीकरणानंतर शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे लसीकरणानंतर आणि आधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लसीकरणानंतर आजारी पडू शकता. कारण लसी घेतल्यानंतर संरक्षण पुरविण्यासाठी पुरेसा वेळ लागत आहे. असे WHO ने स्पष्ट केले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -