घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटफेक न्यूज: ब्रिटनच्या पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यूची खोटी बातमी व्हायरल!

फेक न्यूज: ब्रिटनच्या पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यूची खोटी बातमी व्हायरल!

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र याचदरम्यान पाकिस्तानच्या डॉन या वृत्तवाहिनीने जॉन्सन यांचे निधन झाल्याचे वृत्त दिले. त्यांनी बीबीसी ब्रेकिंग न्यूज नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून आलेल्या ट्विटच्या नुसार ही बातमी प्रसारित केली.

इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रुमला असं आढळलं की, डॉन या वृत्तवाहिनीने ज्या ट्विटर अकाऊंटवरून बातमी दिली ते बीबीसीचे ट्विटर अकाऊंट नसून ते एक फेक ट्विटर अकाऊंट आहे. बीबीसीचे अधिकृत ट्विटर अकाऊंटचे @BBCBreaking असं नाव आहे. तर ज्या ट्विट अकाऊंटवरून त्यांनी जॉन्सन यांची बातमी प्रसारित केली. त्या ट्विट अकाऊंटचे @BBCbreaki असं नाव आहे.

- Advertisement -

पत्रकार नाइला इनायत आणि अतिका रेहमान यांनी याचुकीबात ट्विट केलं आहे. ज्या फेक ट्विटर अकाऊंटवरून जोन्सन यांच्या निधनाची बातमी ट्विट केली होती. त्याने हे ट्विट डिलीट केलं आहे.

- Advertisement -

युकेचे कॅबिनेट कार्यलयाचे मंत्री मायकल गोव्हल यांनी मंगळावरी एलबीसी रेडिओला सांगितलं की, पंतप्रधान व्हेंटीलेटवर नसले तरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांनी ऑक्सिजन देण्यात येत आहे.


हेही वाचा – CoronaVirus: न्यूयॉर्कमध्ये मृतदेहांचा खच, २४ तासात ७३१ जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -