घरट्रेंडिंगCoronaVirus: लॉकडाऊनमुळे कुटुंबाने केली आत्महत्या!, घ्या सत्य जाणून

CoronaVirus: लॉकडाऊनमुळे कुटुंबाने केली आत्महत्या!, घ्या सत्य जाणून

Subscribe

सध्या देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी लॉकडाऊन वाढवला असल्याची घोषणा केली. ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका कुटुंबाने आपल्या चिमुकल्या मुलीसोबत झाडावर लटकवून घेतलेले दिसत आहे. लॉकडाऊन दरम्यान हे कुटुंब सूरतला आपल्या घरी पायी जात होते. मात्र रस्त्यामध्ये ते थकले आणि त्यांना भूक सहन न झाल्याने या कुटुंबाने आत्महत्या केली असा दावा केला जात आहे.

- Advertisement -

मात्र एका वृत्त संकेत स्थळाने यांची पडताळणी केली. त्यावेळेस हा फोटो खूप पूर्वीचा असल्याचं समोर आलं. या फोटोचा कोरोना व्हायरसच्या कारणामुळे झालेल्या लॉकडाऊनशी कोणताही संबंध नाही. पडताळणी करताना हा फोटो एक वर्षापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आलं आहे. शाहीन अलोम नावाच्या युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ ८ मे २०१९ रोजी अपलोड केला होता.

हे आत्महत्या करणारे कुटुंब कोण आहे? कधी आणि का आत्महत्या केली? याबद्दल या व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती दिली नाही आहे. परंतु हा फोटो एका वर्षापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. म्हणजेच ही घटना जुनी असून हा व्हायरल होणाऱ्या फोटोवरील माहिती ही फेक आहे. याचा लॉकडाऊनशी काहीही संबंध नाही.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: गौरी खान पुढे सरसावली, केली ९५ हजार लोकांच्या जेवणाची सोय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -