घरदेश-विदेशFact Check: WhatsApp वरून खरंच करता येते लसीकरणासाठी नोंदणी?

Fact Check: WhatsApp वरून खरंच करता येते लसीकरणासाठी नोंदणी?

Subscribe

देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. गेल्य़ा २४ तासात रूग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा पार केला. देशात वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरचं लसीकरण मोहिमही त्याच वेगाने सुरु आहे. आत्तापर्यंत १ कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस घेतलीय. मात्र अद्याप काही नागरिक कोरोना लसीसाठी नोंदणी कशी करायची याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. याच दरम्यान WhatsAppवरून कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येते असा मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. पणं खरंच WhatsApp च्या माध्यमातून लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येता का जाणून घेऊया.

WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोरोना लस घेण्यासाठी कशी नोंदणी करताय यासाठी एक मोबाईल नंबर दिला आहे. 9745697456 असा हा नंबर आहे. यानंबरवर HI असा मेसेज केल्यास नागरिकांकडे आधारकार्डवरील डिटेल्सची मागणी केली जाते. तसेच तुम्ही राहत असलेल्या शहराच्या पिनकोड नंबरच्या मदतीने रुग्णालय शोधायचे आहे असे सांगितले जातेय. अशी सर्व माहिती घेऊन तुम्ही लस घेण्यासाठी नोंदणी करता येते असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक लोक या मेसेजवर विश्वास ठेवत आहे. परंतु हा मेसेज खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या खोट्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका.

- Advertisement -

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, को-विन आणि आरोग्य सेतू या दोन अँपच्या माध्यामातूनच तुम्ही लसीकरणासाठी अधिकृत नोंदणी करु शकता. इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करु शकत नाही. त्यामुळे WhatsApp वर लसीकरण नोंदणीबाबत फिरणारा मेसेज खोटा असून त्यातील माहिती देखील खोटी आहे. नागरिकांनी या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नका असे सांगण्यात येत आहे. तसेच पीआयबीनेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. को-विन आणि आरोग्य सेतू या दोन अँपच्या माध्यामातूनच तुम्ही लसीकरणासाठी अधिकृत नोंदणी करु शकता. कोणीही WhatsApp वरून लसीकरणाच्या नोंदणी करण्याबाबत सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध राहा, कारण तुम्ही फसू शकता असा आवाहन पीआयबीने आपल्या ट्विटमधून केले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -