घर देश-विदेश विश्वास हेच भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य, उज्ज्वल भविष्याबाबत पंतप्रधान मोदींनी केले आश्वस्त

विश्वास हेच भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य, उज्ज्वल भविष्याबाबत पंतप्रधान मोदींनी केले आश्वस्त

Subscribe

नवी दिल्ली : राष्ट्रीयत्वाची जाणीव, हा एक असा शब्द आहे, जो आपल्याला समस्यांमधून मुक्त करत आहे. आज राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेने एक गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे, ती म्हणजे, विश्वास. विश्वास हेच भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी उज्जवल भविष्याचा विश्वास दिला.

भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित केले. प्रत्येक नागरिकांवरचा आमचा विश्वास, प्रत्येक नागरिकाचा सरकार विश्वास, प्रत्येक नागरिकाचा देशाच्या उज्वल भवितव्यावर विश्वास, आणि अवघ्या विश्वाचाही भारतावर असलेला विश्वास. हा विश्वास आमच्या धोरणांचा आहे, आमच्या कार्यपद्धतीचा आहे, भारताच्या उज्वल भवितव्याच्या दिशेने आम्ही ज्या निर्धाराने मजबूत पावले टाकत आहोत त्यावरचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi Speech : “75 वर्षांत काही विकृती…” पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर साधला निशाणा

एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे भारताचे सामर्थ्य आणि भारताकडे असलेल्या संधी या विश्वासाची नवी मर्यादा ओलांडणार आहे आणि विश्वासाच्या नव्या उंचीवर देश नव्या सामर्थ्यासह वाटचाल करत आहेत, असे सांगत मोदी म्हणाले, आज देशात जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी आलेल्यांचा पाहुणचार करायची संधी भारताला मिळाली आहे आणि वर्षभरापासून हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे जी ट्वेंटी अंतर्गत अनेक प्रकारचे आयोजन केले गेले आहे, त्यातून देशातल्या सामान्य नागरिकांच्या सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली. भारताच्या विविधतेची ओळख करून दिली. भारताच्या विविधतेकडे जग आश्चर्याने पाहात आहे आणि त्यामुळेच त्यांचे भारताप्रती आकर्षण वाढले आहे.

- Advertisement -

कोरोनानंतरच्या काळात जग नव्याने विचार करू लागले आहे. ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर, एक नवी जागतिक व्यवस्था आकाराला आली होती, कोरोनानंतर एक नवी जागतिक व्यवस्था, एक नवे भूराजकीय समीकरण अगदी वेगाने आकार घेऊ लागले आहे. भूराजकीय समीकरणाची सर्व व्याख्या, परिभाषा बदलू लागल्या आहेत. या बदलत्या जगाला आकार देण्यात तुमचे सामर्थ्य दिसत आहे आणि तुम्ही एका निर्णायक वळणार उभे आहात, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा – पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…, पंतप्रधान मोदी यांना विश्वास

कोरोना काळात भारताने ज्या पद्धतीने वाटचाल सुरू ठेवली, त्यातून जगाला भारताच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला आहे. जेव्हा जगभरातली पुरवठा साखळी उद्धस्त झाली होती. मोठमोठ्या अर्थव्यवस्था संकटात होत्या, अशावेळी देखील आपण बोललो होतो की, आपल्याला जगाचा विकास करायचा असेल तर आपल्याला मानवकेंद्री दृष्टीकोन बाळगायला हवा. आपण मानवी संवेदनां महत्व देता आलं पाहीजे. तरच आपण आपल्या समस्यांवर योग्य उपाययोजना करू शकतो. कोविडने आपल्याला धडा दिला की, मानवी संवेदनांना दूर सारून आपण जगाचे कल्याण नाही करू शकत, असेही ते म्हणाले.

- Advertisment -