Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश फैजाबाद नाही तर अयोध्या!!

फैजाबाद नाही तर अयोध्या!!

Subscribe

उत्तरप्रदेशातील फैजाबाद जिल्हा आता अयोध्या म्हणून ओळखला जाईल. अशी घोषणा केली आहे. अयोध्येतील दिपोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

प्रयागराज, अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम आणि आता अयोध्या. ही आहे मोदी सरकारनं नामांतर केलेल्या शहरांची नावं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता फैजाबाद जिल्हा अयोध्या म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली. अयोध्येतील दीपोत्सवाच्या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी ही घोषणा केली. दीपोत्सवादरम्यान योगीजी बस एक काम करो, मंदिर का निर्माण करो अशी मागणी होत होती. यावेळ योगी आदित्यनाथ यांनी आजपासून फैजाबाद जिल्हा अयोध्या म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी आज मी एक संकल्प घेऊन अयोध्येत आलो आहे. शिवाय, अयोध्याला काय हवंय हे संपूर्ण देशाला माहित असल्याचं म्हणत उपस्थित जनसमुदायाला राम मंदिराच्या मुद्यावरून आश्वस्त केलं. यावेळी योगी यांनी अयोध्येतील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव ‘दशरथ’ आणि प्रस्तावित विमानतळाचे नाव ‘राम’ ठेवण्याची घोषणा देखील केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर दिसत आहे. सध्या राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, शरयू नदीच्या काठी रामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा देखील योगी आदित्यनाथ करणार आहेत. राम मंदिराच्या मुद्यावरून संघ देखील आक्रमक झाला असून राम मंदिरासाठी कायदा करा, जमिन हस्तांतरण करा अशी मागणी होत आहे.

वाचा – #NoMandirNovote, राम मंदिरावरून पंतप्रधानांना आवाहन

साऊथ कोरिया कनेक्शन 

अयोध्येमध्ये सुरू असलेल्या दीपोत्सवामध्ये साऊथ कोरिया कनेक्शन देखील समोर आलं. या कार्यक्रमाला साऊथ कोरियाच्या फर्स्ट लेडी कीम जंग सुक या देखील हजर राहिल्या आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये  कीम जंग सुक आदित्यनाथ यांच्यसोबत सहभागी देखील झाल्या. यावेळी केंद्रीय मंत्री व्हि. के. सिंग यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

वाचा – योगी सरकारनं झकाना स्टेडियमचं नाव बदललं

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -