घरताज्या घडामोडीसंतापजनक! उपचारा दरम्यान रुग्णाचा झाला मृत्यू, बनावट डॉक्टरने मृतदेह रस्त्याच्याकडेला फेकून काढला...

संतापजनक! उपचारा दरम्यान रुग्णाचा झाला मृत्यू, बनावट डॉक्टरने मृतदेह रस्त्याच्याकडेला फेकून काढला पळ

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तसेच मृत्यूचे प्रमाण देखील तितकेच वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. अशा परिस्थितीचा देखील काही लोकं फायदा घेताना दिसत आहेत. म्हणजे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार करणे किंवा बनावट डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणे. अशीच काहीशी संतापजनक घटना उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील खागा कोतवाली क्षेत्रामधील वैसापूर गावात घडली आहे. एका बनावट डॉक्टरच्या इथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. ज्यानंतर हा बनावट डॉक्टर रुग्णाचा मृतदेह रस्त्याच्या किनारी फेकून फरार झाला. सध्या या बनावट डॉक्टरचा शोध सुरू आहे.

नक्की काय घडले?

किशनपूर ठाणा क्षेत्रातील बरेची गावात राहणारा ५५ वर्षीय श्रीचंद्र यादवला अचानक ताप आला. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बनावट डॉक्टरकडे घेऊन गेले. उपचारादरम्यान रुग्णाची तब्येत आणखी खालावली. त्यानंतर बनावट डॉक्टरने नातेवाईकांना सांगितले की, तो रुग्णाला घेऊन शहरातील रुग्णालयात घेऊ जात आहे. मग तो रुग्णाला बाईकवर घेऊन गेला आणि रस्त्याच्या किनारी मृत परिस्थिती सोडून फरार झाला.

- Advertisement -

या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. माहितीनुसार, किशनपूर पोलीस स्टेशन परिसरातील राहणारी राणी देवीने प्रभारी निरीक्षक खागा यांच्याजवळ तक्रार दिली आहे. तक्रारीत सांगितले आहे की, तिचा पतीची तब्येत बिघडली होती, ज्यामुळे उपचारासाठी त्या डॉक्टरकडे नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिच्या पतीची तब्येत आणखीन बिघडली. मग आरोपी डॉक्टरने फतेहपूरला उपचारासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर रस्त्याच रुग्णाचा मृत्यू झाला आणि बनावट डॉक्टर रुग्णाला रस्त्यांमध्ये सोडून पळून गेला.


हेही वाचा – नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर केला सतत बलात्कार, लग्न ठरल्याचे समजताच आरोपीने सासरच्यांना पाठवला अश्लील व्हिडिओ


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -