घरताज्या घडामोडीPension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आर्थिक निकषात बदल

Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आर्थिक निकषात बदल

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानसिक किंवा शारिरीकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मुलांना किंवा भावंडांना यापुढे पेन्शनचा लाभ हा नव्या निकषानुसार मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. पेन्शनसाठीचा नवा आर्थिक निकष आज जाहीर करण्यात आला आहे. एखाद्या कुटूंबात अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीही कौटूंबिक पेन्शनसाठी पात्र असतील. या पेन्शनसाठी निकष ठरविण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने एका पत्रकाच्या माध्यमातून फॅमिली पेन्शनसाठी नव्या आर्थिक निकषांची घोषणा केली आहे. या नव्या बदलामुळे आणखी आर्थिक फायदा मिळणार आहे. येत्या ८ फेब्रुवारी २०२१ पासून नव्या निकषानुसार ही फॅमिली पेन्शन लागू होणार आहे.

सध्या सरकारी कर्मचाऱ्याचे विकलांग अपत्य किंवा भावंडेही या फॅमिली पेन्शनसाठी पात्र आहेत. ज्या कुटूंबांचे महिन्यापोटीचे उत्पन्न हे सर्व प्रकारच्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून ९ हजारांहून अधिक नाही अशाच कुटूंबांसाठी सध्या या पेन्शनचा लाभ मिळत आहे. त्यामध्ये डिअरनेस अलाऊन्सचाही समावेश आहे.

- Advertisement -

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नवे निकष जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये एखाद्या कुटूंबाचे सर्व प्रकारच्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न हे त्या व्यक्तीला मिळणाऱ्या शेवटच्या पगाराच्या तुलनेत ३० टक्क्यांहून कमी असेल तर अशा व्यक्तीचे कुटूंबीय हे त्या पेन्शनसाठी पात्र असतील. येत्या ८ फेब्रुवारी २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने नव्या निकषानुसार ही फॅमिली पेन्शन लागू होणार आहे.


हेही वाचा – बँकांच्या सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार पगार; पेंशनर्स आणि EMI संबधित RBI ची मोठी घोषणा

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -