Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराचा झटक्यामु निधन

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराचा झटक्यामु निधन

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदान यांचे कोरोनामुळे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीत कोरोनावर उपचार सुरु होते याचदरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. दरम्यान अँकरिंग क्षेत्रात रोहित सरदाना यांचे मोठे नाव होते. झी न्यूज प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर रोहित सरदान सध्या आज तकसह काम करत होते. आज तकवर त्यांचा दंगल हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय ठरला.

- Advertisement -

दरम्यान रोहित सरदाना यांचा निधनाची माहिती झी न्यूजचे वरिष्ठ पत्रकार सुधीर चौधरी यांनी ट्विटरवरून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील रोहित सरदाना यांचा निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

कोरोना काळात आत्तापर्यंत वार्तांकन करताना अनेक पत्रकारांना कोरोनाने बळी घेतला आहे. देशात मार्च २०२० पासून ते आत्तापर्यंत सरदाना यांच्याह ६५ हून अधिक पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ३२ पत्रकार फक्त २०२१ मधील चार महिन्यातच दगावले आहेत. यात उत्तर प्रदेश आणि तेलंगणातील सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही गेल्या वर्षी पुण्यात मृत्यू झाला होता.

- Advertisement -