प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांची प्रकृती बिघडली, ICUमध्ये उपचार सुरू

उर्दू कवी आणि लेखक मुनव्वर राणा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लखनऊच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून याची माहिती मुलगी सुमैया राणा यांनी दिली.

सुमैय्या राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, वडील व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी त्यांना लखनऊतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. वडिलांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करा, असंही सुमैय्या यांनी म्हटलं आहे.

डायलिसिसच्या वेळी वडिलांच्या पोटात खूप दुखू लागले होते. डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करायला सांगितला होता, त्यानंतर त्यांच्या पित्ताशयात काही समस्या आढळल्या. लगेचच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी आपल्या वडिलांसाठी पुढील ७२ तास फारच महत्वाचे असल्याची माहिती सुमैय्या यांनी दिली.

मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी आहेत. उर्दू साहित्यासाठी २०१४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि २०१२ मध्ये शहीद शोध संस्थानकडून माटी रतन सन्मानने त्यांना गौरवण्यात आलं होतं.


हेही वाचा : तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मायदेशात, विमानतळावर उतरताच साधला जनतेशी संवाद