घरक्राइमप्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला अटक, मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला अटक, मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

Subscribe

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदींना पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी सुनावलेली तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यानंतर दलेर मेहंदींना पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी प्रकरणात अटक केली आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदींना पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी सुनावलेली तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यानंतर दलेर मेहंदींना पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी प्रकरणात अटक केली आहे. दलेर मेहंदींवर अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. याआधी पटियालाच्या न्यायालयाने दलेर मेहंदींना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

दलेर मेहंदीची याचिका फेटाळली –

- Advertisement -

शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देत दलेर मेहंदी यांनी पटियाला सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस.ग्रेवाल यांनी दलेर मेहंदींची याचिका फेटाळून लावली. या निर्णयानंतर  पोलिसांनी दलेर मेहंदी अटक केले.

मिळाला होता जामीन –

- Advertisement -

दलेर मेहंदींनी या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले. मात्र, येथे दलेर मेहंदींना मोठा झटका बसला असून न्यायालयाने त्याची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. या आधी दलेर मेहंदींना 3 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने बेल मिळाली होती.  दलेर मेहंदीचा मोठा भाऊ शमशेर सिंग हाही मानवी तस्करी प्रकरणी आरोपी आहे.

काय आहे प्रकरण –

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी विरुद्धचा हा खटला 15 वर्षे जुना आहे. 2003 मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर मानवी तस्करीशी संबंधित 30 हून अधिक प्रकरणे असल्याचे सांगण्यात येत आहे. 15 वर्षांच्या सुनावणीनंतर 2018 मध्ये पटियाला न्यायालयाने त्याला 2 वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली होती.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -