Farm Laws : तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Farm Laws Have decided to repeal three farm laws, says PM Modi in address to nation
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायद्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी आज शेतकऱ्यांसाठीचा तीन कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, आम्ही कृषी कायदा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पीएम मोदींनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, तुम्ही घरी परत जा, शेतात परत जा, कुटुंबाकडे परत जा, नवी सुरुवात करा.

यावर बोलताना मोदी पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी तीन कृषी कायदा आणला, जेणेकरुन छोट्या शेतकऱ्यांची ताकद आणखी वाढू शकेल.या कायद्यासाठी वर्षानुवर्षे देशातील शेतकरी आणि तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञांकडून मागणी केली जात होती. हे कायदे आणल्यावर संसदेत चर्चा झाली. देशातील शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत केले, पाठिंबा दिला. मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, आपल्या सरकारने हा कायदा देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी आणला होता, गोरगरिबांच्या आणि गावाच्या हिताला पूर्ण पाठिंबा देऊन, उदात्त हेतूने हा कायदा आणला होता. पण ही गोष्ट आम्ही काही शेतकर्‍यांना शेतकर्‍यांच्या हितासाठी आहे हे पूर्णपणे समजावून सांगू शकलो नाही. तरीही शेतक-यांचा एक वर्ग विरोध करत होता. आम्ही वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. असंही मोदी म्हणाले.

“दीड वर्षांनंतर कर्तारपूर साहेब कॉरिडॉर पुन्हा सुरु”

“दीड वर्षांनंतर आता कर्तारपूर साहेब कॉरिडॉर पुन्हा सुरु झाला आहे. गुरुनानक यांनी सांगितले आहे की, संसारात सेवेचा मार्ग निवडल्यानेच जीवन यशस्वी होतं, आमचं सरकार सेवा भावनेतून देशवासियांचं जीवन सुलभ बनवण्यास कटिबद्ध आहे. गेल्या अनेक पिढ्या स्वप्न पाहत होती ती स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या सशेतकऱ्यांसमोर अडचणी, आव्हांना खूप जवळून पाहिले आहे. देशाने मला २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून सेवेची संधी तेव्हा कृषी विकास, कल्याण विकासाला सर्वोच्च प्राथमिकता दिली. ”असंही मोदी म्हणाले.

“देशातील शंभरमधील ८० शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक आहे. छोट्या जमिनीच्या सहाय्यानं ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. हे अनेक लोकांना माहिती नाही. देशातील छोट्या शेतकऱ्यांसमोरील आव्हानं दूर करण्यासाठी बियाणं, विमा आणि बाजारपेठ यावर सर्व बाजूनं कामं केलं, ”असं मोदी म्हणाले.